पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र सर्जेराव रणमोडे सर यांची निवड.
इंदापूर :शनिवार दिनांक 3/1/2024 रोजी हिंदी पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाच्या कार्यकारणीची सहविचार सभा घेण्यात आली. या सभेत पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांनी *लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे चे सहशिक्षक व इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे विद्यमान अध्यक्ष यांची पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड केली*.
यावेळी महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक महामंडळ चे उपाध्यक्ष ता का सूर्यवंशी , महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी कार्याध्यक्ष शिवाजी खांडेकर तसेच हिंदी भाषा विषय समिती सदस्या डॉ. रंजना पिंगळे ,माजी विशेष हिंदी भाषा अधिकारी बालभारती पुणे डॉ.अलका पोतदार ,महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ सदस्य उस्मान मुलाणी ,पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे उपाध्यक्ष गजानन गोसावी, सचिव सौ अनिता चौधरी, हिंदी जिल्हा समन्वयक सुधाकर भोंग , इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे सचिव के डी भोंग उपस्थित होते.
या निवडीबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*, निरा भिमाचे सहकारी कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील ,तसेच ज्येष्ठ संचालक उदयसिंह पाटील ,सचिव किरण पाटील ,उपाध्यक्ष मनोज पाटील ,व प्राचार्य भीमराव आवारे सर यांनी रणमोडे सर यांचे अभिनंदन केले.

