ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने फा. रणनवरे यांचा धार्मिक व सामाजिक योगदानाबद्दल गौरव
राहाता प्रतिनिधी:
ज्यांना मानवी मूल्यांना वर्धित करणारा विकास हवा आहे त्यांचे प्रश्न प्रत्येक पातळीवर खूप तोकडे पडताना दिसत आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ख्रिस्ती समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला मोठा लढा उभारावा लागेल असे प्रतिपादन फा. ज्यो. गायकवाड यांनी केले
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर देवालय चर्च च्या यात्रा सोहळ्याप्रसंगी भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बाळ येशु देवालय चर्चेचे प्रमुख धर्मगुरू फा. अब्राहाम रणनवरे, संजय पंडित, सतीश कदम, अनिल चक्रनारायण, मायकल वाघमारे, फ्रान्सिस ओहळ, जॉन गुलदेवकर, विलास सोनवणे, ऑलविन कलघाटकी, राँणी परेरा, मुक्ती प्रसाद, आनंद बोधक, डिकन अक्षय आढाव आदी धर्मगुरू व धर्मभगिनींची सोहळ्यास उपस्थिती होती.
फा. गायकवाड पुढे म्हणाले, ख्रिस्ताने दिलेल्या मूल्यांच्या आधारावर शांतीचा संदेश देत ख्रिस्ती सभा आपले कार्य करीत आहे परंतु आज समाजाची होत असलेली अधोगती लक्षात घेता योग्य नियोजनाची गरज आहे. याप्रसंगी फा. रणनवरे यांच्या धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, फा. ज्यो. गायकवाड फा. सतीश कदम, आदित्य घाटगे व धर्मगुरूंच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यात्रा सोहळ्याप्रसंगी सुधाकर बनसोडे, फिलीप कदम, प्रमोद तोरणे, अनिल ब्राह्मणे, आशिष बनसोडे, रमेश शिरसागर, बोधक गुरुजी, शशिकांत कदम, ओ, के, माघाडे, दावीद बनसोडे, मुन्ना लोखंडे, जॉन कदम, श्रीधर भोसले, प्रकाश लोखंडे, यांच्यासह जिल्ह्यातील धर्मगुरू धर्म भगिनी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सक्षम तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. तर फा. अब्राहाम रणऩवरे यांनी शेवटी आभार मानले.
*पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

