shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वकील संरक्षण कायदा पारित करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा बार असोसिएशनचा भव्य मोर्चा


अहमदनगर प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी शहरातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली. त्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, वकील संरक्षण कायदा पारित करावा या मागणीसाठी अहमदनगर मध्ये जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात आला होता. 

यावेळी आ. संग्राम जगताप, आ. बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे, अनिस शेख, किरण काळे, संजय झिंजे, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड आदि राजकीय पुढारी सहभागी झाले.

जिल्हा बार असोसिएशन तसेच राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीरामपूर आदि ठिकाणच्या वकिलांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाईची करण्याची खरी गरज आहे. तसेच वकील दाम्पत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, सरकारी वकील म्हणून अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच लवकरच वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करुन निवेदन देण्यात आले. 
सराईत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाया केल्या असत्या तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या, समाजविघातक लोकांना कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे, या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असल्याचे सांगितले. तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.

राहुरी शहरातील वकील दांपत्याचा निर्घुण हत्येच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, तसेच जिल्हाभरातील वकीलांचे भाषणे झाली
राहुरी शहरातील वकील दांपत्य खून खटल्याचा निषेध करत विविध मागण्यांसाठी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेला पायी भव्य मोर्चा जिल्हा न्यायालय, डीएसपी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी वकील बंधू - भगिनी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

*ज्येष्ठ पत्रकार जी.एन.शेख अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close