श्रीरामपूर प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे डोंगराने वेढलेला तालुका,याच तालुक्यातील हरिश्चंद्रगडच्या पायथ्याशी असलेली दुर्गम भागातील शाळा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या पाचनई प्राथमिक शाळेत कृतिशील शिक्षक किरण बांडे वैविध्यपूर्ण तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत शाळेचा गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहे.
शाळेमध्ये भौतिक सुविधांबरोबरच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले घेत असतात, त्यात वाचनवृद्धी करण्यासाठी ग्रथालयाचा प्रभावीपणे वापर करत ,डबकी ग्रंथालय, त्याचबरोबर हस्तलेखन सुधारण्यासाठी दररोज दैनंदिनी लेखन, वन्यजीव वन विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या पर्यावरण संदर्भात निबंध आणि वकृत्व मध्ये विद्यार्थी सहभाग, आरोग्य जनजागृती संबंधी मार्गदर्शन, ब्रेन स्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटी ,चित्र कोडे selfie with success,
कृतीयुक्त गोष्टींचे उपक्रम,लॅपटॉप द्वारे अध्यापन, विविध प्रकारे प्रात्यक्षिक आणि उपक्रम, क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान देणे असे वेगळ्या प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये केले जातात.
शाळेला वेळोवेळी सहकार्य लाभलेले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पालक यांच्या सहभागातून हे उपक्रम निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे. अशा विविध उपक्रमांची यशस्वी अमलबजावणी शाळेत केली जात असल्याने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर चे वरीष्ठ आधिव्याख्याता अरुण भांगरे, गटशिक्षणाधिकारी - अभयकुमार वाव्हळ, शिक्षण विस्तार - अधिकारी बाळासाहेब दोरगे, केंद्रप्रमुख शकील बागवान सर यांनी शाळेला वेळोवेळी भेटी देऊन कामाचे कौतुक करत गुणवत्तेबाबत मार्गदर्शन केले आहे. या सर्व गोष्टी एकत्र बांधत मुख्याध्यापक किरण बांडे सर यांनी या शाळेचा कायापालट केला आहे.
*बॉक्स* 👇
----------------------------------------
"पाचनई सारख्या अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नवोपक्रमांची अमंलबजावणी उपक्रमशील शिक्षक श्री.किरण बांडे करत आहेत,हे विशेष कौतुकास्पद आहे. शिक्षकांनी आपल्यातील उपक्रमशीलता जोपासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न केले तर दुर्गम भागातील शाळांचा नक्कीच कायापालट होईल.
यापुढील काळातही गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक, शाळांना डायट कढून नियमित प्रोत्साहन आणि मदत, मार्गदर्शन केले जाईल .."
- *श्री. अरुण भांगरे*
वरीष्ठ आधिव्याख्याता तथा संपर्क अधिकारी -जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर
---------------------------------------
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

