shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिरसाटवाडी गावामध्ये बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जीवन ज्योत अपंग संस्था इंदापूर आणि ॲड नितीन कदम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ३ दिवसीय स्वाभिमानी युवा संमेलन उत्साहात संपन्न.

शिरसाटवाडी गावामध्ये  बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जीवन ज्योत अपंग संस्था इंदापूर आणि ॲड नितीन कदम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  ३ दिवसीय स्वाभिमानी युवा संमेलन उत्साहात संपन्न.

प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे,शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे,कु. मोनिका काळे यांची व्याख्याने नवीन पिढीमध्ये बदल घडवणारी झाली संपन्न.
इंदापूर:- शिरसटवाडी गावामध्ये हिंदुरुदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जीवन ज्योत अपंग संस्था इंदापूर आणि ॲड नितीन कदम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला ३दिवसाची आयोजित केली होती. गेली १८ वर्षे ही परंपरा कायम ठेवली आहे.  ग्रामीण भागातील शिरसाटवाडी सारख्या छोट्याशा गावात सदरची व्याख्यान मला आयोजित केली असता, गावातील महिला तसेच मुले ,मुली व गावातील गावच्या आसपास खेड्यातून लोक व्याख्यानाचा आस्वाद घेत असताना दिसत होते.या मध्ये कॉलेज युवक, युवती महिला यांची गर्दी तुडुंब होती .यावेळी प्रथम पुष्प म्हणून बाप समजून घेताना या विषयावरती वसंत हंकारे  यांचे व्याख्यान झाले. आज रोजी मोबाईलच्या युगामध्ये आणि धावपळीच्या जगामध्ये माणूस मुलांना कुटुंबांना कमी वेळ देतो व भौतिक सुखाच्या पाठीमागे धावतो .त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊन मुलांमध्ये संस्कार  सम्य पिढी घडताना दिसून येत नाही. त्यावेळी अशा व्याख्यानातून आई वडील बाप या नात्यांना स्पर्श करत मुलींना व बसलेल्या प्रत्येकाला आपला बाप समजून सांगण्याचा प्रयत्न वसंत हंकारे यांनी केला. त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. कारण वयस्कर बापाला समजून घेणे तेवढे सोपे नाही. याची प्रचिती बसलेल्या प्रत्येकाला आली होती. तिथून उठल्यानंतर प्रत्येक जण दोन मिनिट का होईना आपल्या बापाजवळ जाऊन बसल्याशिवाय राहणार नाही एवढे विचार वसंत हंकारे सरांनी पहिल्या दिवशी दिले.
 दुसरे पुष्प शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी यांनी हिंदुरुदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र या विषयावरती संबोधित करत असताना बाळासाहेब ठाकरेंचा मराठी बाणा तसेच त्यांचे महाराष्ट्रावरील असलेले प्रेम महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगारी पासून कामास कसे जावे. म्हणजेच छोटा व्यवसायिक असेना मग तो वडापावचा का असेना तो करणे गरजेचे होते तसेच दिलेला शब्द कायम पाळण्याच्या संदर्भात वचनबद्ध राहण्याची शिकवण सांगितली उपस्थित त्यांना बाळासाहेबांची एखादी गोष्ट एखाद्याच्या कानामध्ये सांगून जर ती कळत नसेल तर कानाखाली वाजवून सांगा. कारण न्याय झाला पाहिजे, अन्याय सहन करू नका. ही शिकवण या व्याख्यानातून मिळाल्याचे दिसून येते. तसेच महाराष्ट्रातील सध्याची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती व बाळासाहेब हायात असते तर त्याचे काय परिणाम झाले असते याचा सखोल उलगडा त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून केला. युवकांना योग्य दिशा मार्गदर्शन कशा पद्धतीने बाळासाहेबांनी केले याचा लेखाजोखा व्याख्याते यांनी युवकांपुढे मांडला. तसेच महापुरुषांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर असतील तर जीवन जगत असताना कितीही खडतर प्रसंग आले तरी ते पार करून पुढे जाता येते हा संदेश तरुणांना व्यासपीठावरून देण्यात आला. 
तिसरे पुष्प कुमारी मोनिका काळे यांनी राजमाता जिजाऊ अहिल्या व सावित्री आणि आजची स्त्री या विषयावरती व्याख्यान दिले .त्यांनी समोर व्यासपीठावरून संबोधित करत असताना, महापुरुषांच्या आणि महाराष्ट्र घडवण्यामध्ये तीनही राजमाता राष्ट्रमाता यांचे योगदान हे समाजातील वंचित बहुजन दुर्बल घटकांना तसेच महिलांना त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रसंगाला सामोरे कसे जाता येऊ शकते. महिलांनी चूल आणि मूलच्या पलीकडे जाऊन प्रगती केली पाहिजे. संस्कारक्षम कुटुंब घडविण्यामध्ये जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी या म्हणीप्रमाणे त्यांनी राजमाता जिजाऊ आणि शिवबा राजे घडविले, शंभूराजे घडविले नवे नवे स्वराज्य घडविले, त्यासाठी स्वतः केलेले प्रयत्न कष्ट यांचा प्रवास सांगितला. तसेच राजमाता अहिल्यादेवी यांच्या विषयी बोलत असताना कोणत्याही जाती धर्मामध्ये न अडकता माझ्या समाजाला न्याय मिळावा म्हणून स्वतः हातात तलवार घेऊन वेळप्रसंगी धार्मिक आधार घेऊन समाजाला योग्य तो न्याय देण्याचे काम केल्याचे सांगितले तसेच शिक्षण हे स्त्रियांच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहे .सावित्रीच्या लेकींना सध्याची परिस्थिती मध्ये शिक्षण प्रशिक्षण कशाप्रकारे मिळणे गरजेचे आहे .आर्थिक सामाजिक राजकीय व स्वसंरक्षणाबाबत स्त्रियांनी कसे जागरण करावे याविषयी कुमारी मोनिका काळे यांनी त्यांच्या व्याख्यानातून स्पष्ट केले. सदरची व्याख्यानमाला ही शिरसटवाडी सारख्या छोट्या गावांमध्ये अखंडपणे चालू राहण्यासाठी जीवन ज्योत अपंग संस्था इंदापूर व ॲड  नितीन कदम मित्र मंडळाच्या सोबतीला तालुक्यातील विविध पदाधिकारी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने हजेरी लावली. सदर व्याख्यानमाला पार पडणे कामी गावातील बापूराव बल्लाळ ,दत्तात्रय भुजबळ, संग्राम कदम ,अजित शिरसाठ अतुल जाधव, संतोष साळुंखे, मंगेश माने सौ सुमन तनपुरे ,सौप्रज्ञा कदम मंगल डांगे व सत्यशोधक परिवाराचे अमर बोराटे सर व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले तसेच निवेदक म्हणून धापटे यांची साथ मिळाल्याचे एडवोकेट नितीन कदम यांनी सांगितले, इथून पुढे सुद्धा या गावांमध्ये विविध व त्यांना वक्ते आणून गावामध्ये समाज प्रबोधन करण्याचे काम चालू ठेवण्याचे नितीन कदम वकील यांनी  सांगितले.
close