श्री भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन पदी दत्तात्रय घोगरे तर भरत कोरटकर सर यांचे व्हा. चेअरमन पदी निवड.
इंदापूर:- पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सुरवड भांडगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी जीवनदायीनी ठरलेली श्री भैरवनाथ सुरवड भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरवड ही उपसा जल सिंचन योजना डॉ शंकरराव मगर , कृष्णराव मगर , ज्ञानदेव मगर , बाळासाहेब घोगरे, कै रामदास दादा कोरटकर यांनी स्थापन केली व गेली तीस वर्ष अविरतपणे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणीपुरवठा करण्याचे काम करते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन झाले आहे. सतत सापडणारा दुष्काळ, नदीपात्रात नसलेलं पाणी व सतत होणारी लाईट बिलाची वाढ या अशा संकटावरती वरती मात करत ही संस्था उभी आहे. पाण्याची बचत व्हावी याकरता पाठ पाणी पद्धत बंद करून संस्थेने २०१९ पासून पाईपलाईन द्वारे शेतकऱ्यांना हिसेवारीप्रमाणे त्यांच्या विहिरीमध्ये पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्रातली पहिली पाणी वाटप संस्था ठरली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्य टळला असून पाण्याचे योग्य वापर होऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू लागले. यामुळे या पाणीवाटप प्रकल्पाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. अशा या पाणीवाटप संस्थेची २०२३ ते २८ या पंचवार्षिक कालावधी करता संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक नुकतीच पार पडली. या मध्ये दत्तात्रय घोगरे सर यांची चेअरमन पदी तर भरत कोरटकर सर यांचे व्हा. चेअरमन पदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक चांगदेव घोगरे, सत्यजित मगर, राजाराम शिंदे, अरुण सुर्वे, महेश घोगरे, शिवाजी कांबळे, हनुमंत शिंदे, ज्ञानदेव भोसले, सोपान परकाळे, सौ सुनीता कोरटकर व श्रीमती रतन नलवडे यांची निवड करण्यात आली. या करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस पी गोलांडे मॅडम यांनी काम पाहिले. निवडणूक बिनविरोध होण्याकरिता डॉ. शंकरराव मगर , सुरेश मेहेर, दादासाहेब घोगरे, ज्ञानदेव मगर , शिवाजी कोरटकर, सतीश घोगरे, दादासाहेब कोरटकर, केशव सुर्वे, साहेबराव घोगरे, दत्तात्रय वाघ, दशरथ सुर्वे, तुकाराम तोरस्कर, बाळासाहेब घोगरे, तुकाराम शिंदे व सुरेश तोरस्कर यांनी अथक परिश्रम घेतले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

