shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निस्वार्थीपणे केलेल्या सेवेचे फळ आयुष्यात नक्की मिळते- हनुमंतराव वाबळे.

*निस्वार्थीपणे केलेल्या सेवेचे फळ आयुष्यात नक्की मिळते- हनुमंतराव वाबळे.
इंदापूर:- इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील चतुर्थ कर्मचारी  कैलास विश्वनाथ राऊत हे संस्थेमध्ये बत्तीस वर्षे सेवा करून ३१ जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले.विद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य  हनुमंतराव वाबळे बोलत होते. 
 राऊत यांनी इंदापूर आणि लासूर्णे या विद्यालयात अतिशय प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली. त्या सेवेचेच फळ त्यांना मिळाले. रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यागाची वृत्ती ठेवून सर्व सेवकांनी आपली भूमिका बजावली पाहिजे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून कर्मवीर अण्णांनी सुरू केलेल्या या संस्थेत आपण विद्यादानाचे काम करत आहात हे आपले भाग्य आहे असे मत व्यक्त केले. 
याप्रसंगी प्रदीप  गारटकर, विठ्ठल ननवरे ,श्रीधर बाब्रस यांनी आपल्या मनोगतातून राऊत यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते  राऊत यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.  राऊत यांच्याकडून विद्यालयाला लेक्चर स्टॅन्ड भेट देण्यात आले तसेच सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.माजी विद्यार्थी अशोक मखरे ,माजी मुख्याध्यापक भिमराव वणवे , सयाजी काटकर यांनी मनोगत व्यक्त केले.माजी मुख्याध्यापक एस.एस. जगताप ,घाडगे , भास्कर वाबळे,रामचंद्र पाटील ,छगन साबळे ,भारत कांबळे,  सुनील जाधव, रेश्मा शेख, वसीम बागवान,सुनिल बोराटे ,अनेक रयत सेवक तसेच राऊत यांचे कुटुंबिय व नातेवाईक उपस्थित होते. उपस्थित सर्वांच्या वतीने श्री राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका सौ.पुष्पा काळे यांनी केले. सूत्रसंचालन संजय गायकवाड व प्रिया भोंग यांनी केले तर सुनील मोहिते यांनी आभार मानले.
close