shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्यू लॉ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न ...


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १४ /  सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पुणे आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचा समारोप समारंभ बुधवार दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वा . न्यू इंग्लीश स्कूल , शिंगवेनाईक ता .नगर  या गावी झाला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त मा. श्री. मुकेश माधवराव मुळे तर प्रमुख अतिथी कार्यकारी मंडळाचे मा. डॉ. अभय गेणूजी खानदेशे हे होते . 

 शिंगवेनाईक गावच्या सरपंच जिजाबाई काळे , उपसरपंच सुनील जाधव , ग्रामसेवक संदिप शेटे ,  संतोष कोहक , गोकुळ बोरुडे , एकनाथ जाधव ,अप्पासाहेब शिंदे ,मुख्याध्यापक गोरखनाथ रेपाळे , अमोल डोळस ,विश्वास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी अतिथींचे स्वागत प्रभारी प्राचार्य प्रा. व्ही. ई. शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गिरिष हिरडे यांनी केले .

याप्रसंगी मुकेशजी मुळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या .
तर डॉ .अभयजी खानदेशे यांनी सांगितले की, संस्था कायमच राष्ट्रीय सेवा योजनेतून गावांचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न करत असते.

 शहरातील विद्यार्थी असून देखील या महावि‌द्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप उत्तमरित्या काम केले असल्याचे विश्वास जाधव यांनी आवर्जुन सांगितले .तर शिक्षक नेते अप्पासाहेब शिंदे यांनी विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी हे सर्व ग्रामस्थांच्या अपेक्षांवर अगदी खरे उतरले असल्याचे नमुद केले .प्रा. पांढरे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या परिक्रमाचे कौतुक केले .

याप्रसंगी शिबिरार्थी विद्यार्थी  गायत्री गुंड , निकीता चव्हाण , कोमल गवळी , ब्रम्हजीत पवार , इंद्रजीत आगलावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
तर आदेश काशिद ,निकीता चव्हाण या उत्कृष्ठ शिबीरार्थींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कॉलेजचे कर्मचारी नारायण पाखरे यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  शुभांगी बाबर या विद्यार्थिनीने अतिशय सुरेखरित्या केले तर
 प्रा. अनुराधा मते यांनी आभार व्यक्त केले .
close