shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरात हुतात्म्यांना अभिवादन


इंदापुरात हुतात्म्यांना अभिवादन

हुतात्म्यांना अभिवादन प्रसंगी उपस्थित मान्यवर.

इंदापूर : इंदापूर येथे जय हिंद आजी माजी सैनिक संघटना व युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (ता. १४) भारत देशासाठी पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना अभिवादन केले. पुलवामा हल्ल्याला १४ फेब्रुवारी २०२४ ला पाच वर्षे पूर्ण झाली. यात सीआरपीएफचे ३९ जवान हुतात्मा, तर २२ जवान जखमी झाले होते. त्या हल्ल्याचा निषेध करीत हुतात्मा जवान अभिवादन या उपक्रमाचे आयोजन केले होते. ज्या जवानांनी देशासाठी आपले प्राण पणाला लावून सेवा केली. त्यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, या उद्देशाने बुधवारी इंदापूर नगरपालिकेच्या प्रांगणात स्वातंत्र्य सैनिक स्मृतीस्तंभास अभिवादन केले.
close