shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुळापाट पाणी कृती समितीची स्थापना..

मिरी,:-
वांबोरी पाठ पाणी कृती समितीची नवनिर्वाचित मिरी-करंजी गटातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची मिरी येथे
मिरी ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर राजा वीरभद्र मंदिर या ठिकाणी मुळा पाट पाणी कृती समितीची बैठक  आनंदाच्या वातावरणात पार पडली. सर्वांनी उत्साही स्वरूपात साथ दिली.मिरी-करंजी गटातील व नेवासा ,पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील वचीत शेतकरी नागरिक पाण्याअभावी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाचे स्वरूप विस्तृत झाले.वांबोरी पाट पाणी कृती समितीची नवीन स्थापना दिनांक १४/०२/२०२४रोजी झाली असून या कार्यक्रमासाठी सन्माननीय वीरभद्र देवस्थानचे भगत सिताराम बाळाजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुळापाट पाणी कृती समितीच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते राजू मामा तागड  ज्यांनी धनगर समाजासाठी तेरा दिवस उपोषण केले होते त्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख म्हणून पैलवान पानसरे छबनराव यांनी सर्वांना तो विषय समजून सांगितला त्यामुळे लढ्याला वेगळी चालना व दिशा मिळाली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष मिरी गावचे धनगर समाजाचे भूषण पै.लक्ष्मणजी सोलाट यांनी केले. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व प्राध्यापक आमदार राम शिंदे साहेब यांची भेट निश्चित करून वांबोरी पाट पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम करणार आहोत. इतिहास संशोधक पै पानसरे सीबी व  सीएम पाटील यांनी अभ्यासपूर्वक पुढील प्लॅन निश्चित केला. वांबोरी चारीचे पाणी हेड टू टेल पूर्ण दाबाने शेतकऱ्यापर्यंत कुठल्याही प्रकारचे वीज बिल न टाकता मिरी-करंजी गटातील किंवा वांबुरी चारी चे पाणी न मिळाल्यास अचानक कुठल्याही प्रसंगी ज्येष्ठ नेते राजू मामा तागड हे आमरण उपोषणाच्या हत्यार शासन दरबारी करतील त्यांना पाठिंबा देण्यासाठी मिरी-करंजी गटातील सर्व शेतकरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी साखळी पद्धतीने उपोषणास बसणार आहेत.यांच्या जीवितास अनुचित प्रकार घडल्या सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. सदर कार्यक्रमाचे आभार सरपंच किरण आव्हाड यांनी मानले.
close