shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ॲट्रोसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल असताना जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर..

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा
सविस्तर वृत्त असे की दिनांक 18/12/23 रोजी रात्री 08.45 वाजेच्या सुमारास फिर्यादी किराणा सामाण खरेदी करण्यासाठी वारेगाव गावातील बस स्टँड समोरील विशाल जाधव यांच्या दुकानावर गेलो असता सामाण खरेदी केल्यावर दुकानदार विशाल जाधव यांच्या फोनपेवर सामान खरेदी केल्याची रक्कम देण्याच्या कारणावरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला, तेव्हा फिर्यादी व त्याचा भाऊ यांना फोन करुन वारेगाव येथे येण्यास सांगितले, तेव्हा विशाल जाधव म्हणाला की तुम्ही खालच्या जातीचे आहात खालच्या जातीचेच राहणार आहात का, कधी सुधारणार आहात, तुम्ही खुप माजले आहेत असे म्हणुन वाद चालु असतांना विशाल जाधव त्यांची आई व वडील बाळासाहेब जाधव हे तेथे आले. 


त्यांनी फिर्यादी याला पकडुन आमच्या मुलाला का शिवीगाळ करतो असे म्हणुन फिर्यादी यांना चापट बुक्याने मारहान केली. व शिवीगाळ केली तसेच फिर्यादी यांची मोटारसायकल क्र. MH 20 GF 4816 बजाज पल्सर ची तोडफोड करुन हे माजले आहेत यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला पाहीजेत असे जोरजोराने बोलत होते. 

तेथे भांडण सोडवण्यासाठी वारेगाव येथेच राहणारे गोकुळ जाधव व गणेश बोरसे यांनी विशाल जाधव यास शांत राहणास सांगितले. पण फिर्यादी घाबरुन गाडी तेथेच सोडुन पळुन गेलो. त्यानंतर फिर्यादी यांना समजले की विशाल जाधव याने फिर्यादी विरोधात पोलीस ठाणे फुलंब्री येथे त्याचे पैसे व दागिणे चोरीला गेलेला गुन्हा दाखल केला त्यामुळे फिर्यादी तेव्हा पासुन गाव सोडुन बाहेर गेलो होतो त्यानंतर दि 06/02/2024 रोजी पोलीस ठाणे फुलंब्री येथे फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध मारहाण तसेच जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी (ॲट्रोसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल केला.

आरोपी यांच्या वतीने ॲड. मयुर बोरसे यांनी दिनांक 12/02/2024 रोजी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश छत्रपती संभाजीनगर यांनी आरोपी यांना अंतरीम अटकपूर्व अर्ज मंजूर केला. आरोपी यांच्या वतीने ॲड. मयुर बोरसे यांनी काम पहिले.

close