पाथर्डी:-श्री मोहटादेवी देवस्थानच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांनी नाईकवाडे यांची नियुक्ती केली. यापूर्वीच्या जिल्हा न्यायाधीश तथा मोहाटा देवस्थानच्या अध्यक्षा माधुरी बरालिया ह्या सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर नाईकवाडे रुजू झाल्याने त्यांच्याकडे मोहटा देवस्थानच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
नाईकवाडे यांनी मोहटादेवीची विधिवत पूजा करून शुक्रवारी (ता.९) पदभार स्वीकारला. विश्वस्त मंडळाकडून नूतन अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त अश्विनी बिराजदार, विठ्ठल कुटे, अॅड. विक्रम वाडेकर, डॉ. श्रीधर देशमुख, अनुराधा केदार, डॉ. ज्योती देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आदी उपस्थित होते. जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मध्ये एकूण १५ विश्वस्त असून या ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश -१ हे असतात.

