shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरीत पार पडला हळदीकुंकू समारंभ.


वडापुरीत पार पडला हळदीकुंकू समारंभ.
फोटो ओळ: हळदी कुंकू समारंभाच्या वेळी खेळ पैठणीतील प्रथम चार क्रमांक व उत्तेजनार्थ महिलांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

इंदापूर:- वडापुरी( ता. इंदापूर) येथील  काटकरवस्ती येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात, महिला पोलीस हवालदार सौ माधुरी लडकत, निलोफर पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलित करून हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीच्या कार्यक्रमाची उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनिताताई खरात यांनी हळदी कुंकू समारंभास विधवा महिलांनाही बोलवण्याचा आग्रह केला व इथून पुढे त्यांना प्राधान्य देत हळदी कुंकवाचा समारंभ पार पाडावा असे म्हटले. तर माधुरी लडकत मॅडम यांनी स्त्रियांनी व मुलींनी सध्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने  अडीअडचणीवर कशी मात करावी याबाबत  यावेळी मार्गदर्शन केले. तसेच  हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा प्रमुख  हेतू व महत्व ,आणि काटकर कुटुंबाचे समाजाप्रती असणारी बांधीलकी ,आपुलकी आणि योगदान या बाबत प्रास्तविकेतून महत्व डॉ. करुणा चंदनशिवे यांनी
अधोरेकित केले .
 
यावेळी श्रीनाथ  सोसायटीच्या संचालिका सौ सविता काटकर, सौ. रेशमा काटकर, सौ रेणुका काटकर व अनेक महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
  सदर कार्यक्रमात महिलांचा आवडता कार्यक्रम संगीत खुर्ची, उखाणे, गाणी व मजेशीर खेळ , खेळ पैठणीच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विजेत्यांना  सौ रेणुका बागल यांच्या वतीने  प्रथम क्रमांकाची पैठणी साडी सौ.अबोली बर्गे ,, शबाना शेख यांच्यावतीने द्वितीय  पारितोषक डिनर सेट सौ. शितल बर्गे , सौ. वैशाली काळे पारितोषक तृतीय कोपर ग्लास सेट सौ गौरी फडतरे, सौ.सुजाता भारती चतुर्थ हेअर ड्रॉ स्टेटनर सौ अमृता देशमुख ,उत्तेजनार्थ सायरा शेख यांच्यावतीने बक्षीस मेकअप सेट सारिका फडतरे तसेच सोनल भोसले यांच्या वतीने टी थर्मास संजीवनी तोबरे यांना देण्यात आले. सदर कार्यक्रम भागवत काटकर निवासस्थान काटकरवस्ती या ठिकाणी श्री भागवत काटकर मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे . 
या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपांजली काटकर यांनी केले.
-----+++++++++
.

close