shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांनी गावचा व विद्यालयाचा नवलौकिक वाढवावा - हर्षवर्धन पाटील - बावडा येथे शिवहर्ष सांस्कृतिक महोत्सव संपन्न .

विद्यार्थ्यांनी गावचा व विद्यालयाचा नवलौकिक वाढवावा - हर्षवर्धन पाटील
 - बावडा येथे शिवहर्ष सांस्कृतिक महोत्सव संपन्न .


फोटो - बावडा येथे शिवहर्ष सांस्कृतिक महोत्सवप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील व मान्यवर
बावडा:
                प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये चांगला कलागुण हा असतोच. या कलागुणांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणजे विद्यालयांमध्ये होणारे सांस्कृतिक महोत्सव होत. विद्यार्थ्यांनी आपल्या भावी जीवनामध्ये विविध क्षेत्रामध्ये मोठे होऊन  गावचा व विद्यालयाचा नवलौकिक वाढवावा, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. 
         बावडा येथील शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलातील सर्व विभागांचा शिवहर्ष संस्कृतिक महोत्सवाच्या  उदघाटन प्रसंगी हर्षवर्धन पाटील रविवारी (दि.४) बोलत होते. दरम्यान या कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय विकास महामंडळाच्या गव्हर्निंग कौन्सिलवर निवड झाल्याबद्दल श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी  ग्रामपंचायतीच्या वतीनेही तसेच बावडा ग्रामस्थांनी हर्षवर्धन पाटील यांचा निवडीबद्दल सत्कार केला.
         हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच चांगली पिढी घडवण्याचे काम करीत आहे. गावातील सर्वांचे सहकार्य असल्याने संस्थेची भरभराट होत आहे. आगामी काळातही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणेसाठी संस्था कटिबद्ध राहील, असे प्रतिपादनही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात केले.
       प्रास्ताविक प्राचार्य डी. आर. घोगरे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मनोज पाटील, जेष्ठ संचालक उदयसिंह पाटील, सचिव व माजी सरपंच किरण पाटील, प्रसाद पाटील, संजय घोगरे, स्वप्निल घोगरे, विठ्ठल घोगरे, पवन घोगरे या संचालकांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य, लावणी, थीम साँग, किर्तन, देशभक्ती गीते, भक्ती गीते, सैनिक गीत आदी विविध प्रकारच्या गीतांचे नृत्य प्रकार सादर केली. या सर्व विद्यार्थ्यांचे हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील यांनी कौतुक केले.  
     या कार्यक्रमास विलासराव वाघमोडे, अशोक घोगरे, मयुरसिंह पाटील, अँड. अनिल पाटील, तेजश्री पाटील, विकास पाटील, सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजित घोगरे, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, सुरेश मेहेर, अमरदीप कळकुटे, सुधीर पाटील, दिलीप पाटील, अजय पाटील, सचिन सावंत, मनोज जगदाळे, अमोल घोगरे, रणजित गिरमे, नामदेव घोगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन अमर निलाखे व एस. टी. मुलाणी यांनी केले. आभार उपप्राचार्य जी. जे. जगताप यांनी मानले.
 _________________________________

close