shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापुरात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभेची जय्यत तयारी.

इंदापुरात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभेची जय्यत तयारी.
इंदापूर: इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रविवारी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार  आहे त्या पार्श्वभूमीवर सदर जाहीर सभेच्या स्थळी जयत तयारी सुरू आहे. 
या कार्यक्रमास इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी  व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
close