जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी ,विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज.प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडीमध्ये मल्हार महोत्सव जल्लोषात साजरा.
इंदापूर : दि. ४ फेब्रुवारी रोजी नर्सरी ते ६ वी व ५ फेब्रुवारी रोजी ७वी ते११वी व फार्मसी असे दोन दिवस मल्हार महोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी विद्यार्थी हा सर्वगुण संपन्न असावा लागतो . नृत्य, नाट्य, संगीत,क्रीडा हा मनुष्य जीवनाचा एक भाग आहे. नृत्य ही सर्वात प्राचीन कला मानली जाते. नृत्य ही कलांची जननी आहे. नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली एक कला आहे .२०० हून अधिक लोकनृत्य ही भारतामध्ये प्रचलित असून कला ही अत्यंत खोलवरची आणि टिकाऊ अशी संपर्कक्रिया आहे. दुसरे काहीहीसाधन्या आधी माणसाने श्वसन व हालचाल केले पाहिजे,आदिम जीवनात अत्यावश्यक असलेली हालचाल म्हणजे नृत्य होय.हालचालींचे लयबद्ध ,आकृतीबंध अवकाशाची आकारिक संवेदना पाहिलेल्या आणि कल्पलेल्या जगाची चित्रमय मांडणी या साऱ्या गोष्टी माणूस नृत्याद्वारे शरीरात उत्पन्न करत असतो. श्राव्य व दृश्य अशा दोन्ही अंगाची लय साधणारी नृत्य ही एकमेव कला आहे. मानवाच्या जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडायचे असेल तर अभिजात कला ही मानवाला तारक ठरते.
पुस्तकी ज्ञानाच्या जोडीला सुप्त गुणांचा विकास होणे महत्त्वाचे आहे . सुप्तगुणांमुळेच विद्यार्थी हा सर्व गुणसंपन्न होतो. या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रामलल्ला प्रतिष्ठान चे थीमसादरीकणसह कोळीगीते,पोवाडा, गोंधळीगीत, भक्तिगीते, लोकनृत्य,देशभक्तीगीते, योगकला,कीर्तन, हुंडाबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, लेक वाचवा लेक घडवा,आधुनिक तंत्रज्ञानाची अतिशयोक्ती ,अशा विविध प्रकारचे मनमोहक व थरारक नाट्याविष्काराचे सादरीकरण करण्यात आले.
प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बक्षीस मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला या कार्यक्रमामध्ये पालकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले यामध्ये पालकांना आकर्षक बक्षीस देण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूचे चांगले आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले निश्चित ध्येय गाठणे, कलेबरोरच, अभ्यासाकडे लक्ष द्यावे. चांगली संगत व शिस्त जोपासावी व चित्रपटातील गोष्टींचे अनुकरण न करता आपल्या आयुष्याला चांगली दिशा द्यावी व चांगले अधिकारी घडावे असे सांगण्यात आले.आपले ध्येय साधण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात, त्यासाठी शिवाजी होऊन कार्य करा.ध्येयवादी बना आपल्या आईवडिलांचे ,गावाचे नाव मोठे करा चांगले अधिकारी बना कार्य करत असताना विद्यार्थ्याने एकनिष्ठ,काकदृष्टी, श्वाननिद्रा, अल्पोपहारी, महत्वत्यागी होऊन कार्य करा व आपल्या गुरूचा मानसन्मान ठेऊन, श्रद्धा ठेवून कार्य करा असे सांगण्यात आले.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट , विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ श्री. सुहास चौरे , सूर्यकांत कोकणे ( पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन), विक्रांत खाडे (रेंज फॉरेस्ट ऑफिसर ,मुंबई) डॉ. सचिन छगनलाल ओंबासे (IAS).(जिल्हाधिकारी धाराशिव) दिलीप ढोले (सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, महाराष्ट्र राज्य). अभिजीत सानप (IAS)सहसंचालक रक्षा मंत्रालय, भारत सरकार सौ.सुजाता ढोले (अति.आयुक्त, नवी मुंबई मनपा), मंगेश देसाई.( प्रसिद्ध सिने दिग्दर्शक) प. पु. श्री.देशमुख गुरुजी (वेदमूर्ती वास्तुतज्ञ व ज्योतिषाचार्य) तसेच संस्थेचे प्रमुख अध्यक्ष तथा मा.सदस्य जि. प.पुणे श्रीमंत ढोले सर , लाखेवाडी गावच्या विद्यमान सरपंच व संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले मॅडम, संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे , संस्थेच्या सहसचिव पौर्णिमा खाडे मॅडम, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदिप गुरव सर ,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर सर ,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार सर,संस्थेचे प्राचार्य राजेंद्र सरगर सर सर्व सुपरवायझर ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ,पालक, यांच्या उपस्थितीत हा मल्हार महोत्सव सोहळा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत गुरव सर, बन सर ,अविनाश माने सर व रेश्मा अनपट मॅडम यांनी केले

