राहूरी कृषी विद्यापीठ ते वांबोरी फाट्याच्या दरम्यान वृध्द महिलेस कार चालका सह दोन महिलेने लुटले..!!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार दिनांक ७ फेब्रूवारी २०२४
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील वृध्द महिला हिराबाई विधाते वय ६५ ही विळद ता. नगर येथे दि ६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नातेवईकाच्या च्या लग्न संमारंभास जात असताना ती नगर मनमाड रस्त्यावर कृषी विद्यापीठाच्या बस थांब्यावर एस टी बसची वाट बघत थांबली असता त्यावेळेस तेथे एक कार थांबली , त्या कार मधील चालक व दोन महिलांनी आजीला कुठे जायचे विचारले तेव्हा आजी म्हणीली की मला विळद ला जायचे आहे. तेव्हा कार चालक म्हणाला आम्ही तुम्हाला सोडतो. म्हणुन हिराबाईस कार मध्ये बसवून घेतले. त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर गाडी जास्त आदळत आहे म्हणुन त्या कारमधील दोन महिलांनी हिराबाईस सिटबेल्ट लावा लागेल असे सांगुन सिटबेल्ट लावण्याच्या बाहण्याने हिराबाईच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे दागिने हडप केले. त्या नंतर कार वांबोरी फाट्या नजीक येताच त्या कार मधील दोन अनओळखी महिलांनी हिराबाईस सांगितले की आजी गाडीत गरम होत आहे. तर तुम्ही येथेच उतरुन दुसर्या गाडीने या असे म्हणून हिराबाईस गाडीतुन उतरुन दिल्यावर कार मधुन खाली उतरले नंतर त्यांच्या लक्ष्यात आले की आपल्या गळ्यातील दागीणे घेऊन कार चालका सह दोन महिलांनी लुटले आहे. तेव्हा त्या रस्त्यावर रडु लागल्याने आजुबाजुला असलेल्या लोकांनी त्यांना विचारले असता त्यांनी मला लुटल्याचे त्यांनी सांगितले. त्या दरम्यांन तेथे डिग्रस येथील राउत मंडपवाले आले असता त्यांनी त्या आजीस ओळखले.
तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला फोन करुन सदरच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांचा मुलगा तेथे आला. व आईला घेऊन घरी घेउन गेला.
ही घटना राहुरी पोलिस स्टेशन हद्दीत बांबोरी फाट्या नजीक घडली असुन पुन्हा नगर मनमाड रस्त्यावर रस्ता लुटीच्या घटना सुरु झाल्या असून मुळानगर फाट्यावर पुर्वी प्रमाणि चेक पोस्ट सूरु करण्याची चर्चा या घटने दरम्यान जमा झालेल्या नागरिकांकडून होत आहे.
या पुर्वीचे राहुरीचे पोलिस निरिक्षक मुकुंद देशमुख यांनी नगर मनमाड रस्त्यावर राहुरी कारखाना व मुळानगर फाट्यावर चेक पोष्ट टाकुन पोलिसांच्या गस्त वाढून नगर मनमाड रस्ता लुटीस अळा घातला होता. पुन्हा आता रस्तालूट करण्याची लुटारुनी नवीनच पध्दत सुरु केल्याने त्यावर राहुरीत नव्याने रुजु झालेले राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजय ठेंगे अशा प्रकारच्या रस्तालुट रोखण्यास काय उपाय योजना करतील या कडे जनतेचे लक्ष्य लागले आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

