shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन साठी शुभांगी ताई पाटील थेट दिल्लीत ; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिल्ली येथे दिले निवेदन..!!

शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या  जुनी पेन्शन साठी शुभांगी ताई पाटील थेट दिल्लीत ; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिल्ली येथे दिले निवेदन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
बुधवार दिनांक ७ फेब्रूवारी २०२४
अहमदनगर :    राज्यातील व देशातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची 2004 नंतर, पूर्वीची पेन्शन योजना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे देशभर व महाराष्ट्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे सदरची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी केंद्राच्या अधिवेशनात बजेटमध्ये याबाबतीचा समावेश करावा यासाठी  शिवसेनेच्या उपनेते तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन च्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी दिल्ली येथे जाऊन थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन दिले.
राज्यात व देशात सन 2004 नंतर पूर्वीची जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात येऊन नवीन अंशदायी पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस लागू करण्यात आलेली आहे. सदरची योजना ही शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची काठी हिरावून घेणारी असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये असल्यामुळे राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मागील अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी असून त्यासाठी शिक्षक व कर्मचारी संघटनां मार्फत अनेक वेळा आंदोलने केली गेली. 

परंतु सदरचा प्रश्न हा केंद्र सरकारचा असल्याचे सांगून दरवेळी राज्य शासनाने आपले हात झटकत कर्मचाऱ्यांच्या व शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. केंद्राची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यास कायम च नकार असतो. परंतु त्याचवेळी विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. परंतु त्याबाबत देखील केंद्र सरकार सदर पेन्शनची रक्कम देण्यास नकार देत असून, त्या राज्यांना केंद्र सरकारने तुमच्या निधीतून कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या असे सांगत आहे. एन पी एस योजनेला कर्मचाऱ्यांचा विरोध असून जुन्या पेन्शन साठी राज्यातील कर्मचारी संघटनांनी व शिक्षक संघटनांनी मिळून अनेक आंदोलने केली, मागील वर्षी देखील शिक्षकांनी व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन साठी एक मोठे आंदोलन केले होते व त्यावेळी अगदी शेवटच्या क्षणी शासनाच्या शब्दावर विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांची फसवणूक झाली होती. त्यानंतर देखील राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी पुन्हा नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान आंदोलन केले होते.
त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख मा उद्धव ठाकरे साहेब यांनी स्वतः आंदोलन स्थळी जात या विषयात हात घालून "शिवसेना सदैव शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे" असे आश्वास्थ केले होते. त्यानुसार पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सतत या विषयात लक्ष देण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवली असून शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भात शुभांगी ताई पाटील यांनी काल केंद्रीय शिक्षण मंत्री मा ना धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली व शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याबाबत मागणीचे निवेदन सादर केले. यासाठी शिवसेना पक्षाकडून देखिल शिवसेनेचे  खासदार व शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेब,पक्ष सचिव खा विनायक जी राऊत साहेब तसेच तसेच खासदार राजन विचारे या सर्वांनी शुभांगी ताई पाटील यांना सहकार्य करत जुन्या पेन्शन साठी पाठबळ दिले. 

शिवसेना नेते खा. विनायक राऊत साहेब यांनी शुभांगी ताई पाटील यांच्या निवेदना सोबत आपले कवरींग लेटर देत या मागणीला दुजोरा देत पेन्शन च्या मागणी साठी मदत केली.व या पुढे ही जुन्या पेन्शन साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सदैव शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close