श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील मुठेवाडगांव येथील संत तुळशीराम महाराज संस्थान येथे अंमळनेर येथील ज्योतिष शास्त्रतज्ञ बालब्रह्मचारी बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांनी भेट देऊन बालसंन्याशी संत तुळशीराम महाराज यांचे दर्शन घेतले. श्री.संत तुळशीराम महाराज यांच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांचा हभप किसन महाराज पवार यांच्या हस्ते तसेच भाजपचे तालुका उपाध्यक्ष डॉ. शंकरराव मुठे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुनील मुठे, रमेश बाराहाते, अमोल मोरे, प्रदीप आसने आदी मान्यवर ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

