shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१८ फेब्रु.रोजी श्रीरामपूर येथे शेती महामंडळ कामगारांचा मेळावा..


श्रीरामपूर प्रतिनिधी:
शेती महामंडळ कामगारांना, खंडकरी यांना जमीन वाटप केल्यावर राज्य सरकारने कामगारांना २ गुंठे जागा देण्याचे व घरकुल देण्याचे आश्वासन दिले होते. कामगारांच्या देय रकमा देण्याचे ठरले होते परंतु अद्याप निर्णय न झाल्याने त्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी व पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी दि १८ फेब्रु रोजी सकाळी ११ वा. श्रीरामपूर येथील कामगार सदन, शिवपार्वती मंगल कार्यालयाजवळ, हरिगाव, टिळकनगर मळ्यावरील कामावरील कामगार,सेवानिवृत्त कामगार,मयत कामगार वारस यांचा भव्य जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सुभाष कुलकर्णी यांनी दिली.

मेळाव्यास सरचिटणीस साखर कामगार सभा श्रीरामपूर अविनाश आपटे,अध्यक्ष साखर कामगार सभा ज्ञानदेव आहेर, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ लढा कृती समिती सुभाष कुलकर्णी,अध्यक्ष कोपरगाव तालुका सा,का,सभा, विनोनाथ गोळींज,आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.शेती महामंडळाची जमीन वाटप झाल्यावर गेल्या दहा वर्षापासून २ गुंठे जागा व घरकुलासाठी कामगार संघटना प्रयत्न करीत आहे परंतु अद्याप निर्णय झालेला नाही.कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी तत्कालीन महसूलमंत्री पतंगराव कदम यांच्याशी तडजोड झाल्याप्रमाणे शेती महामंडळ संचालक मंडळ ठरावाप्रमाणे रु ९९ कोटी,५० लाख कामगारांची देय रक्कम देण्याचे ठरले ती अद्याप मिळालेली नाही.
२००८ ते २०१२ या चार वर्षाचा ८.३३ टक्के बोनस.तसेच समान कामास समान वेतन,ग्रॅज्यूटीबाबत न्यायालयाने निकाल दिलेले आहेत.त्यावर उच्च न्यायालयात शेती महामंडळाने अपील केले आहे.
४ थ्या ५ व्या वेतन आयोगाचा फरक मिळाला नाही.६ व्या वेतन आयोग देण्यासाठी राज्य सरकारकडे महामंडळाने प्रस्ताव पाठविला आहे.त्यावर निर्णय नाही.शेती महामंडळ लक्ष्मीवाडी येथील ५०० एकर जमीन विनामुल्य एमआयडीसी साठी शिर्डी येथे दिली आहे.बेलवंडी मळ्याची ६०० एकर जमीन श्रीगोंदा एमआय डीसीसाठी दिली आहे.साकुरी निमगाव,कनकुरी या ग्रामपंचायतीना व शिर्डी यांना १०० एकर विनामुल्य दिली.एका बाजूला कामगारांच्या देय रकमा दिल्या जात नाही,संयुक्त शेतीला १० वर्षापूर्वी जमिनी दिल्या, त्यामुळे ६००० कामगार बेकार झाले.विनामुल्य जमीन वाटप चालू आहे.हा कामगारांवर अन्याय आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे.त्यासाठी मेळावा आयोजित केला आहे.मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन चिटणीस साखर कामगार सभा श्रीरामपूर अशोक पाटील, चिटणीस सा,का,सभा,भालचंद्र कोल्हटकर आदी पदाधिकारी यांनी केले आहे.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close