कळाशी येथे पार पडला शेतकरी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रम.
इंदापूर: पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजे कळाशी येथे श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी शेतकरी मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि अधिकारी अमर फडतरे यांनी केले.
उजनी बॅक वॉटर परिसरामध्ये प्रमुखाने ऊस व केळी ही प्रमुख पिकांचे क्षेत्र असल्याने, ड्रीप इंडिया इरिगेशन कंपनीचे कषितज्ञ डॉ. गुणवंत डफरे हे प्रमुख व्याखाते होते. त्यांनी केळी व ऊस पिकाबाबत जमिनिची निवड पासुन ते कापणी / तोडणी पर्यंत. खतांचे नियोजन, पाणी व्यवस्थापन् इत्यादि बाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी निलेश देवकर, रयत क्रांती संघटना पुणे, अध्यक्ष किसन गोलांडे, सुनिल सुर्यवंशी, पोपट भासले, आप्पासाहेब किसन देवकर, योगेश भोसले तसेच केळी ऊस उत्पादक शेतकरी बहुसंख्येने हजर होते.
. ड्रीप इंडिया कंपनीचे प्रतिनिधी, श्री किरण बाळासो कदम हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. युएस शेख यांनी केले. व आभार अजित घोगरे विस्ताराधिकारी यांनी केले.

