गणेशवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाजीराव घोगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
फोटो- गणेशवाडी गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाजीराव घोगरे यांचा सत्कार करताना हर्षवर्धन पाटील
इंदापूर :गणेशवाडी-बावडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व बावडा येथील यशवंत विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान संचालक बाजीराव विलासराव घोगरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत इंदापूर येथे मंगळवारी प्रवेश केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी बाजीराव घोगरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, माजी सरपंच किरण पाटील, ग्रा.पं. सदस्य विठ्ठलराव घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते. इंदापूर तालुक्याला भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे विकासाभिमुख नेतृत्व लाभले आहे, सदरच्या नेतृत्वाला ताकद देण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे बाजीराव नाना घोगरे यांनी यावेळी सांगितले.
-----

