shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शून्यातून विश्व निर्माण करणारे चंद्रशेखर पवार यांना रोटरी वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मान

शून्यातून विश्व निर्माण करणारे चंद्रशेखर पवार यांना रोटरी वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मान
प्रा. सागर घरत.
भिगवण:प्रतिनिधी
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 व भिगवन रोटरी क्लब यांच्या वतीने देण्यात येणारा रोटरी एक्सलन्स अवार्ड हा भिगवण येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक चंद्रशेखर देविदास पवार यांना देण्यात आला. चंद्रशेखर पवार हे अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्तिमत्व त्यांनी ज्या चहाच्या टपरी मध्ये कामाला राहिले ती चहाची टपरी मालक  विजय पुजारी यांनी शेखर पवार यांना चालवायला दिली आणि या संधीचा लाभ उठवित  पवार यांनी अपार कष्ट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हॉटेल ज्योती मिसळ या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिसळ फेमस केली आणि त्या माध्यमातून भिगवणचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवले. हॉटेल ज्योती मिसळ सोबतच त्यांनी ज्योती व्हेज ,ताराई मंगल कार्यालय  असे वेगवेगळे व्यवसाय केले. समाजाने त्यांना भरपूर दिले याचे भान ठेवून त्यांनी भिगवण व पंचक्रोशी मध्ये गोरगरिबांना मदत करणे, स्मशानभूमी नूतनीकरण करणे,भैरवनाथ मंदिराची कमान उभा करणे,आपले मित्र  बापूराव थोरात यांना घेऊन त्या दोघांनी अंत्यविधीसाठी रथ उपलब्ध केला अशी वेगवेगळी समाज उपयोगी कार्य केले या सर्व कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ भिगवण व रोटरी क्लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट 3131 zone 3 यांच्यावतीने पुणे येथे त्यांना  प्रांतपाल DGND रो. नितीन ढमाले, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या वोकेशनल टीम चे डायरेक्टर रो. वसंतराव माळुंजकर, को डायरेक्टर रो. शिरीष पुराणिक,AG हनुमंत पाटील,रोटरी क्लब भिगवणचे अध्यक्ष  रणजित भोंगळे,वोकेशनल डायरेक्टर प्रवीण वाघ , संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले यांनी  रोटरीने विश्वातून पोलिओ निर्मूलनाचे जे काम केले आहे त्याचा आढावा घेतला व समाज कार्य करत असताना रोटरी सोबत येऊन काम करण्याचे आवाहन केले या  वेळी रोटरी क्लब भिगवण चे खजिनदार कुलदीप ननवरे डायरेक्टर संजय रायसोनी प्रदीप वाकसे , अल्ताफ शेख व योगेश चव्हाण व झोन मधील रोटरीयन्स उपस्थित होते.
close