shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शिवाजी महाराज "यांची जयंती पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी येथे मोठ्या उत्साहात साजरी.

छत्रपती शिवाजी महाराज "यांची जयंती पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी येथे मोठ्या उत्साहात साजरी.
इंदापूर:- आज सोमवार दिनांक  19.02.2024 रोजी " छत्रपती शिवाजी महाराज " यांची जयंती पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, निरवांगी. येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
        नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी निरवांगी चे  संस्थापक -अध्यक्ष  प्रा. डॉ. हणमंत संपतराव पोळ आणि संस्थेचे उपाध्यक्ष  विठ्ठल पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे श्रीफळ व पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
        विद्यालयाचे मुख्याध्यापक  शिरसट सर यांच्या नियोजनातून सर्व कार्यक्रमाची रूपरेषा  तयार करण्यात आली. यामध्ये  छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषा तील दोन विद्यार्थी आणि मा जिजाऊ साहेब यांच्या वेशभूषेत  एक विद्यार्थिनी  तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या  वेशभूषा तील विद्यार्थी यांची अश्वावरून गावात मिरवणूक करण्यात आली, या निवडणुकीत इयत्ता आठवी व नववी मधील विद्यार्थिनींनी लेझीम खेळून प्रात्यक्षिक करून दाखवले. भगवा झेंडा हे एक खास आकर्षण होते. संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढली, या मिरवणुकीत  संस्थेचे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त भाग घेतला.
        कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयातील विद्यार्थिनी यांनी साड्या परिधान करून आणि फेटे  घालून एक वेगळं आकर्षण तयार केले होते. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपले विचार उत्कृष्टरित्या मांडले. शेवटी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. एच.एस.पोळ  सर यांनी आपले बहुमोल विचार व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.
      विद्यालयाचे  मुख्याध्यापक  शिरसट सर यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
close