लोकसभेचे वरिष्ठ बघून घेतील. काळजी करून विनाकारण कोणाचे महत्त्व वाढवू नका - आमदार दत्तात्रय भरणे.
इंदापूर:- लोकसभेचे वरिष्ठ बघून घेतील. काळजी करून विनाकारण कोणाचे महत्त्व वाढवू नका. वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यावरती आपण आपलं बघूया अशा शब्दात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी काढलेल्या विषयासंदर्भात आमदार दत्तात्रय भरणे यांनी लोकसभेचे सुतवाच नीर निमगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ९ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर आयोजित जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.
यावेळी मा. जि. प. सदस्य प्रताप पाटील, मा. जि. प. सदस्य श्रीमंत ढोले, कार्याध्यक्ष अतुल झगडे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष संग्रामसिंह पाटील, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, शिंदे सर, संजय रुपनवर , सुभाष ढरंगे ,पंजाब भगत, शिवाजी राजे ,नूरमोहम्मद शेख ,शब्बीर काजी, मारुती माने, मोहन जाधव, तानाजी जाधव ,शिवाजी जाधव, कांतीलाल शिंदे ,चंद्रकांत जाधव, सुनील निकम, संजय जाधव, अण्णा पवार ,रंजीत घोगरे, भारत जाधव, वैजनाथ साळुंखे, जोतीराम घोडके, अच्युत जाधव ,शशिकांत चांगण ,रामकृष्ण गरगडे, दीपक गरगडे ,राजेंद्र जाधव, आजिनाथ गरगडे, बाळू देवडे, हनुमंत गरगडे, सुरेश जाधव मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच आमदार भरणे पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा.
पूर्वीचे निर- निमगाव आणि आत्ताचे निर- निमगाव यामध्ये काही फरक दिसतो का असा सवाल उपस्थित करीत दत्तात्रय भरणे म्हणाले नदीचा पूल झाल्यानंतर सहा महिन्यांनी वाहतूक वाढल्यामुळे या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळेल. या गावातील जोशी समाज मार्केटिंग च्या कामानिमित्त बाहेर असतो या कामांमध्ये जर काय अडचण आली तर तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून हा आमदार तुमच्या पाठीशी कायमचा उभा राहील असा शब्द त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रस्ते, नदीवरचा पूल आणि पाणीपुरवठा संदर्भात बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, पाणीपुरवठ्याची योजना ही १ कोटी ७० लाख रुपयांची असून लोक म्हणतील की शपथ का वाहतो.ज्यांनी काम केलं तो शपथ वाहण्यासाठी कोणाच्या बापाला भिणार आहे. तुमच्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात त्यांना विचारा याचा आराखडा कोणी बनवला. ही योजना कोणी मंजूर केली आहे. या आराखड्यावरती कोणाची सही आहे. गावातील पिण्याची पाण्याची योजना, मागासवर्गीय योजनेतील रस्ते, गटर असतील हे कोणी मंजूर केलेले आहेत .जर तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा आराखडा किंवा हा रस्ता ज्याचा नारळ फोडला. जर मंजूर मी नसेल केला तर परशुरामबाबा आणि डोंगरनाथ हे मला बघून घेईल. आणि तुमचा यामध्ये रस्त्यामध्ये संबंध नसताना . तुम्ही जर नारळ फोडत असाल? हे दोन्ही देव तुम्हाला सुद्धा बघून घेतील. हो आपले नाणे खणखणीत आहे .खोटे नाटे किती दिवस शो करणार आहे. किती दिवस लोकांना फसवणार आहे. किती दिवस चहा प्यायला, जेवायला यायचे म्हणून किती लोकांची दिशाभूल करणार आहे असा टिकात्मक सवाल विरोधकांचे नाव न घेता दत्तात्रय भरणे यांनी केला.
तसेच ते ग्रामस्थांना सवाल करत पुढे म्हणाले की, याचा विचार सर्वांनी कुठेतरी केला पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेले आहे .लोकांसाठी, गरीब माणसासाठी, भटक्या समाजासाठी काम केलं आहे .आणि भविष्यात करायचे आहे.या गावातील विकास कामे राहिलेले आहेत. ही काम राष्ट्रवादी पक्षचे करणार आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री अजितदादा पवार आहेत. या राज्याची अर्थमंत्री या नात्याने आर्थिक चावी राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे उद्या परवा दिवशी येणाऱ्यांना विचारा या पाण्याच्या आराखडा मंजूर करताना कोणाची सही आहे. त्या कमिटी मध्ये आमदार म्हणून कोण होतं. गावातील पाण्याचा टँकर जरी लावायचा असेल तर त्यावर ते आमदाराची सही लागते. त्यामुळे गप्पाठप्पा मारणारे, शो करणारे, कुठे काय माहिती यांना जोशी समाजाची काय व्यथा आहे किंवा इतरांची काय व्यथा आहे. फक्त निवडणुकीला यायचं आणि काहीतरी थातूरमातूर करायचं. अशा लोकांना तुम्ही जागा दाखवा. आमदारकीच्या निवडणुकीला तुम्हाला मतदान मागण्यासाठी आलो नाही. तुम्ही लोकांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं. चांगल्या प्रकारचे मतदान केलं .त्याबद्दल आयुष्यामध्ये कधी विसरलो नाही. तुम्हाला लोकांना कधी आयुष्यात विसरणार नाही असा शब्द या कार्यक्रमानिमित्त आमदार भरणे यांनी दिला तसेच लोकांच्या घरकुल योजना तसेच १९ बी च्या कॅनलच्या कामासंदर्भात लवकरच काम करू. असा विश्वास एवढी त्यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, ज्ञानदेव जाधव, मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट:-
पेय जल योजनेच्या कामासाठी काहीजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना माहित नाही आमदार दत्तात्रेय भरणे हा इंदापूर तालुक्याचा राजा आहे- दत्तात्रय घोगरे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, बावडा निर निमगाव रस्ता गेल्या ५०ते ६० वर्षांमध्ये ह्या रस्त्याचे कोणीही मनावर घेतलं नव्हतं. विजयदादा पालकमंत्री असताना निर निमगाव ते चौक एवढेच रस्त्याचे काम झाले होते. परंतु हा रस्ता बावडा निर निमगाव या रस्त्याला जोडण्याची भावना कोणालाही झाली नाही. आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये कामाचा धडाका लावला. त्या धडाक्यामध्ये बावडा निमगाव या रस्त्याचे भूमिपूजन ते काम चालू होणार आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या आमदार फंडातून चाळीस लाख रुपयाचा तळ्याच्या कडेने बायपास रस्ता तयार झाला. निर निमगाव गावामध्ये दुष्काळी परिस्थिती असून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या संकटावर मात करण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या निर निमगाव साठी पेय जेलची योजना मंजूर केली. टंचाई आराखड्यातही आमदार दत्तात्रय भरणे यांनी निधी टाकला आहे. पेय जल योजनेच्या कामासाठी काहीजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना माहित नाही आमदार दत्तात्रेय भरणे हा इंदापूर तालुक्याचा राजा आहे. इंदापूर तालुक्यातील आराखडा, जिल्ह्याचा आराखडा, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे यांनी जो आराखडा ठरवला नुसत्या निरनिम गावचं सोडून द्या. परंतु इंदापूर तालुक्यातल्या कुठल्याही वाडी वस्तीवर पेय जल असेल किंवा कुठलीही योजना असेल ते आणण्याचे काम रात्रीचा दिवस करून आपल्या साठी भरणे मामांनी केलं. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. विधानसभेच्या वेळेस बावडा जिल्हा परिषद गटात मतदानामध्ये पहिला क्रमांक आहे परंतु कमी मताने आहे परंतु या वेळेस नीर निमगाव च्या सर्व नागरिकांच्या वतीने जाहीर करतो की यावेळेस जिल्हा परिषद गटांमध्ये उच्चांक झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मोठं कामाचं ओझ आमच्या गावासाठी केलं. गेल्या दोन वर्षांमध्ये शंभर शेतकऱ्यांना गाय गोठा प्रकरणाचा लाभ झाला. १५४ लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळाल्या. विधवा शेतकरी महिलांसाठी पाच हजार रुपयांचे अनुदान २५ ते ३० महिलांना मिळाले. १९ बी चा कॅनॉल दरवर्षी तो डीप कट मधून जात असल्यामुळे त्यामुळे तो कॅनल बुजतो. त्यावेळी त्या कॅनलचे इस्टिमेट तयार करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला. आठ ते दहा दिवसांमध्ये ४ कोटी २० लाख रुपयाचे इस्टिमेट तयार झाले. ते काम तुम्ही मंजूर करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

