shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

" पुढचं पाऊल ” ह्या पुस्तकाचे कव्हर पेज प्रसिद्ध

" पुढचं पाऊल ” ह्या पुस्तकाचे कव्हर पेज प्रसिद्ध 
अकोले ( प्रतिनिधी ) मराठ्यांसाठी मार्गदर्शक होणारे आजचा निश्चय  " पुढचं पाऊल”  ह्या पुस्तकाचे कव्‍हर पेज प्रसिद्ध करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीयध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार झाले आहे.

        ज्ञानाची आस, गुणवत्‍तेचा विकास, व्‍यावसायिकतेचा ध्‍यास या अनुषंगाने  मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्‍ती, गुणात्‍मकतेची व्‍यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्‍यासाठी जनजागृती मोहीम आहे.  या पुस्तिकेमध्‍ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्‍वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंबसंस्‍था, जमिनीचे रेकार्ड कसे ठेवाल, प्रगत शेती, विधिसाक्षरता, अर्थसाक्षरता, नको नुसत्‍याच एम.पी.एस.सी. च्‍या वाटा, स्‍मार्ट फोन सोशल मिडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र व राज्‍य सरकारच्‍या व विविध महामंडळांच्‍या कर्ज योजना, विद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक असलेल्‍या शासकीय आणि खाजगी १२५ शिष्‍यवृत्‍तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, व‍सतिगृह, निर्वाह भत्‍ता, अशी उपयुक्‍त माहिती या पुस्तिकेत आहे.
     या पुस्तिकेच्‍या माध्‍यमातून राज्‍यभरात महासंघाचे कार्यकर्ते प्रत्‍यक्ष कुटुंबाना भेट देऊन वितरीत करणार आहेत. त्‍यामुळे सुमारे ३ लाख कुटुंबा पर्यंत समाज संघटन व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्‍यावसायिक जागृतीसाठी हा उपक्रम असून आपल्‍या जिल्‍ह्यामध्‍ये महासंघाचे सर्व पदाधिकारी सभासद हे जनजागृतीसाठी घरोघर संपर्क साधणार आहेत.
        या पुस्तका चे वैशिष्टे म्हणजे क्यू आर कोड च्‍या द्वारे नामवंत व्‍यक्‍तींच्‍या समाजाला संदेश तसेच विविध प्रकारची माहिती जाणार आहे. या पुस्तिकेच्‍या मुखपृष्‍ठावर आंतरराष्‍ट्रीय कंपन्‍यांचे वित्‍तीय सल्‍लागार डॉ. गिरीष जाखोटिया, ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे,  पुणे विद्यापीठ माजी कुलगुरु डॉ. अरुण अडसुळ, ज्‍येष्‍ठ विधिज्ञ उज्‍वल निकम, ज्‍येष्‍ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन संस्थेचे बाबा भांड, बीव्‍हीजी ग्रुप पुणे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, सह्याद्री फार्म नाशिक चे अध्यक्ष विलास शिंदे,  मगरपट्टा सिटी पुणे चेअरमन सतीष मगर, ग्‍लोबल कोकण स्‍वराज्‍य भूमी अभियान अध्यक्ष संजय यादवराव, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, संवाद कौशल्‍य, वकृत्‍व कला प्रशिक्षक  शशांक मोहिते इ. मान्‍यवरांचे संदेश दिले आहेत.

आजचा निश्‍चय, पुढचं पाऊल” हे पुस्तक मराठा समाजाला दिशादर्शक असेल ते अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने मोफत वितरीत केली जाणार आहे.
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
अखिल भारतीय मराठा महासंघ,  अकोले तालुका
close