shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे-सोलापूर महामार्गावर दतकलेजवळ झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू:नुकतेच महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नववधूचाही मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर दतकलेजवळ झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू:नुकतेच महिन्यापूर्वी  लग्न झालेल्या नववधूचाही मृत्यू
प्रा.सागर घरत 
भिगवण:प्रतिनिधी
   आज सकाळी  साडे सातच्या दरम्यान स्वामीचिंचोली च्या हद्दीमधील दत्तकलेजवळ सकाळी सेलेरो कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे यात एका नववधूचाही समावेश आहे अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीवरून  पुण्यात कामानिमित्त स्थायिक असणारे मस्के कुटुंबीय पुण्यावरून सोलापूरला आजारी आजीला भेटण्यासाठी सेलेरो(एमएच12,एलजे6054)कारमधून निघाले होते.त्यांची कार स्वामी चिंचोली गावच्या हद्दीतील दत्तकलेजवळ आली असता  सोलापूर कडे निघालेल्या मालवाहू ट्रकला पाठीमागून जाऊन जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात
 बुबासाहेब धेंडे,सासरा राजू मस्के,नववधू राधा मस्के यांचा जागीच मृत्यू झाला.तर राधा मस्के हिचा पती अजय मस्के काजल मस्के हे गंभीर जखमी झाले आहेत.राधा मस्के व अजय मस्के यांचा यांचा मागील महिन्यातच विवाह झाला होता.
  अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा ॲम्बुलन्स चे मालक केतन वाघ हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तिन्ही मृतदेह हे भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे पुढील कार्यवाहीसाठी नेले तर जखमींना भिगवण आयसीयु हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून त्यांच्या वरती उपचार चालू आहेत. घटनास्थळी भिगवण पोलीस चे कर्मचारी व रस्ते महामार्ग पोलीस हे तातडीने पोहोचुन पुढील कार्यवाही चालू झाली होती.
close