श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील ग्रामपंचायत सदस्य सौ.दुर्गावती सदाशिव पटारे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर अहमदनगर महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ. सपनाताई मोरे यांचे स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र नुकतेच शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे हस्ते त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील सामाजीक कार्यकर्ते व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संघटक सदाशिव पटारे यांच्या पत्नी असलेल्या सौ. दुर्गावती सदाशिव पटारे या गेल्या १५ वर्षापासून खोकर ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. तसेच आनंदी ग्राम संघ व खोकर येथील गोरक्षनाथ बचत गटाच्या अध्यक्ष, प्रभात संघ महिला बचत गटाच्या तालुकाध्यक्ष असलेल्या दुर्गावती पटारे या राजकारणाबरोबरच सामाजीक कार्यात ही नेहमीच अग्रेसर असल्याने त्यांना ही संधी मिळाली आहे.
यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे, सेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शारदा लगड, तालुका संघटक कल्पना वैद्य, शहर प्रमुख रेखा फाजगे, ग्राहक मंचचे जिल्हाध्यक्ष अशोकराव थोरे, उपजिल्हा प्रमुख सचीन बडधे, रामदास गोल्हार, विधानसभा संघटक संजय छल्लारे, तालुकाध्यक्ष लखन भगत, राधाकीसन बोरकर, डॉ. महेश क्षीरसागर, भरत मोरे, औद्योगीक सेनेचे तालुकाध्यक्ष मच्छींद्र पटारे, शेखर दुबैय्या, सदा कराड, अरूण पाटील, विठ्ठल सोनवणे, सुहास वहाडणे, निखील पवार, मच्छींद्र धुमाळ, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुन्ना सय्यद, संजय शिंदे, दत्ता डोंगरे, शिवाजी दोंड आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

