श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना नोंदणी करून एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर नुतणीकरणासाठी ९० दिवसांचे प्रमाणपत्र हे आता ग्रामपंचायतीकडून घेण्याचे आदेश असतानाही तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचेकडून संबधीत कामगारांना सदरचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याने संघटनेच्या वतीने श्रीरामपूरचे गटविकास अधिकारी यांना निवदेनाद्वारे कामगारांची अडवणूक थांबविण्याची मागणी असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्यावतीने नोंदीत बांधकाम कामगारांसाठी नोंदणीकरून एक वर्ष पुर्ण झालेनंतर नुतणीकरण करणे गरजेचे आहे परंतू संबधीत विभागाने आता ठेकेदार अर्थात इंजिनियर यांचे नुतणीकरणासाठी लागणारे ९० दिवसांचे प्रमाणपत्र रद्द केल्याने हे अधिकार आता शासनाच्या परीपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजेच ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
परंतू तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे सदरचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने अनेक कामगारांचे नुतणीकरण होवू शकले नाही. तसेच हे कामगार हे अशिक्षीत आहेत. दररोजच्या रोजी रोटीमुळे त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने संबधीत कामगारांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्याने व जिल्ह्याचे ठिकाणचे अंतर ही जास्त असते त्यामुळे कामगारांची गैरसोय होवू नये म्हणून तालुक्यातील संबधीत ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना अधिकार दिलेले असतानाही संबधीतांकडून कामगारांची अडवणूक केली जात असल्याचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
या निवेदनावर श्रीरामपूर तालुका असंघटीत बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप शेरमाळे, सचीव गणेश छल्लारे, रामदास खंडागळे, संजय परदेशी, भाऊसाहेब पगारे, जालींधर धनवटे, नवनाथ जाधव, अंबादास धनवटे, राजेंद्र थोरात, रविंद्र पिटेकर आदिंच्या सह्या आहेत.
श्रीरामपूरचे - गटविकास अधिकारी यांना असंघटीत कामगारांच्या अडवणूकीबाबतचे निवेदन देताना असंघटीत बांधकाम कामगार संघटनेचे संदिप शेरमाळे, गणेश छल्लारे, रामदास खंडागळे, संजय परदेशी, भाऊसाहेब पगारे, जालींधर धनवटे, नवनाथ जाधव, अंबादास धनवटे, राजेंद्र थोरात, रविंद्र पिटेकर आदि दिसत आहेत.
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

