shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नामस्मरण हे साधन तर मनाचा व कृतीचा निर्मळपणा हेच साध्य- हभ.प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर


श्रीरामपूर प्रतिनिधी:
मानवी जीवन संस्कृतीतून घडते. भक्ती ही मनाची शक्ती आहे. संतांनी उपयुक्त जीवनसूत्र सांगितले आहे. भक्तीत नामस्मरण हे साधन आहे तर मनाचा व कृतीचा निर्मळपणा हे जीवनाचे साध्य आहे, असे विचार ह.भ.प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी व्यक्त केले.

   श्रीरामपूर येथील इंदिरानगरमधील माजी मुख्याध्यापक भागवत मुठे पाटील यांनी आयोजित संतपूजनप्रसंगी आचार्य डॉ.शुभम महाराज कांडेकर बोलत होते.

यावेळी मुख्याध्यापक श्री.मुठे व सौ.मुठे यांनी संतपूजन केले. भारत मुठे व सौ. मुठे यांनी नियोजन केले. डॉ. बाबुराव उपाध्ये सर्वांचा परिचय करून दिला. संत आणि आजचा समाज यावर चर्चा केली. प्राचार्य किसनराव वमने यांनी संतांची गरज सांगितली. ह. भ. प. सोपानराव वेताळ यांनी पुस्तके भेट देऊन महाराजांचा सन्मान केला. आचार्य डॉ. कांडेकर महाराज म्हणाले, वेताळ महाराज यांनी सविस्तर व चिंतनपर संत रोहिदास महाराज यांचे चरित्र लिहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भक्तगण उपस्थित होते.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close