भोर :-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत भोर तालुक्यातील नवसह्याद्री शैक्षणिक संकुलातील एमबीए व एमसीए विभागात नवसह्याद्री व सेवंथ सेन्स टॅलेंट सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे रोजगार प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पोपटरावजी सुके साहेब यांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिबिरात भाग घेऊन उत्कृष्ट कंपनीमध्ये निवड होण्यासाठी आवाहन केले. या शिबिरामध्ये श्री आदित्य सर व श्री विनय कुमार सर यांनी स्पर्धात्मक युगातील टेक्नॉलॉजी वर प्रशिक्षण दिले तसेच संगणक युगातील पायथॉन, जावा आदी टेक्निकल विषयावर मार्गदर्शन केले प्रत्येक विद्यार्थ्याला 20 ते 30 कंपनीसाठी संधी दिली जाणार असल्याचे सांगितले.
एमबीए व एमसीएचे संचालक डॉ. तानाजी दबडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व रोजगार संधी साठी स्वतः खर्च करणारी एकमेव संस्था म्हणजे नवसह्याद्री. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण व रोजगार संधी मिळवून देणे हा संस्थेचे अध्यक्ष माननीय पोपटरावजी सुके साहेब यांचा मानस आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर डॉ. बाळासाहेब भामनगोळ, डॉ. लक्ष्मण डोईफोडे, डॉ. सुहास पाखरे, डॉ. सुनील खिल्लारी, डॉ. प्रमोद जाधव, डॉ. लक्ष्मण रेनापुरे व आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास पाखरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. रमेश काकडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे ग्रुप डायरेक्टर माननीय सागरजी सुके यांनी कौतुक केले.

