shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले - हर्षवर्धन पाटील

ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले - हर्षवर्धन पाटील 
इंदापूर :प्रतिनिधी दि.23/2/24
                
राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी सरांच्या निधनाने राज्यातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व काळाच्या पडद्यात गेले आहे. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, या शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
         मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली  शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळात प्रथमच मला मंत्री म्हणून सन 1995 मध्ये काम करण्याची संधी मिळाली. मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम करीत असताना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून संयम, सुसंस्कृतपणा, नम्रता, कार्यकर्त्यांना सन्मान देणे, लोकहिताचा निर्णय घेणे अशा अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या मंत्रिमंडळात सर्वात कमी वयाचा मी मंत्री असताना व प्रथमच आमदार झालो असतानाही त्यांनी मंत्रिमंडळात माझ्याकडे 3 खात्यांची जबाबदारी दिली तसेच महत्त्वाच्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कायम माझ्याकडे दिले. मनोहर जोशी यांनी मागणी करताच इंदापूर तालुक्यात लोणी देवकर येथे पंचतारांकित एमआयडीसी मंजूर केली. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भरभरून दिले. इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये मनोहर जोशी सरांचे योगदान मोठे आहे, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
____________________________
close