सामाजिक उपक्रमातून वंचित,उपेक्षित,अनाथ घटकांना योगदान देणाऱ्या मयुरा दीदी यांचा आज वाढदिवस...
इंदापूर :- सौ मयुरा मधुकर पाटील राहणार अंबिकानगर,इंदापूर यांचे माहेर इंदापूर व सासर लातूर जिल्ह्यातील वाडी वाघोली असून सध्या त्या इंदापूर येथील राजश्री शाहू मेडिकल,पाटील हॉस्पिटल या ठिकाणी त्यांचे पती मधुकर पाटील यांच्यासोबत मेडिकल सांभाळतात.
मयुरा या श्री गजानन ठोंबरे सर व सौ नंदा ठोंबरे यांच्या कन्या आहेत व श्री मधुकर पाटील यांच्या पत्नी आहेत. तसेच लातूर येथील पाच वेळा सरपंच असलेले जुने कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख होती असे श्री ज्ञानेश्वर पाटील व सौ लोपामुद्रा पाटील यांच्या त्या सुनबाई आहेत.
वडिलांच्या व आईच्या छत्रछायेखाली लाडात वाढलेल्या मयुरा यांचा जन्म इंदापूर मधे 26 फेब्रुवारी 1986 साली झाला. त्यांचे आई-वडील नेहमीच म्हणतात की मयूरच्या रूपाने आमच्या घरी लक्ष्मीच आली.
मयुरा ही अतिशय मनमिळावू व हसऱ्या स्वभावाची जीवाला जीव देणारी आहे इंदापूर मध्ये तिची ओळख मयुरा दीदी म्हणूनच आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण झेडपी शाळा इंदापूर येथे झाले माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण एस एन आर हायस्कूल येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ती रामकृष्ण मोरे कॉलेज,आकुर्डी येथे बीएससी पदवीसाठी गेली. नंतर कॉलेज ऑफ फार्मसी, अकलूज येथे डी फार्मसी पूर्ण केले.
सरांना दोनच मुली... वंशाला दिवा पाहिजे या विचित्र विचाराला फाटा देत सरांनी दोन्ही मुलींना स्वतःच्या पायावर उभे केले व निर्भीड बनवले.
मुलगा हा वंशाला दिवा असला तरी दिव्याची वात ही मुलगीच आहे हे समाजाने विसरता कामा नये.
दोन मुली ह्याच आपल्या वारसदार आहेत हा आदर्श सरांनी समाजामध्ये निर्माण केला.
समाजामध्ये वावरत असताना निर्भीड,धीट पण योग्य मार्गाने चालावे ही त्यांच्या आई वडिलांची शिकवण त्यांना नेहमीच उपयोगी पडली.
चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली.
मेडिकल मध्ये त्यांचे पती श्री मधुकर पाटील यांच्यासोबत मेडिकल क्षेत्रामध्ये त्या कार्यरत असतात .मेडिकल चालवत असताना अपंग, निराधार वृद्ध लोक असतील तर त्यांना औषधे कमी पडू नयेत म्हणून कधीही पैशाचा विचार न करता त्यांच्याकडून ही सेवा पुरवली जाते. यामध्ये त्यांचे पती मधुकरजी मोलाचे काम करतात. डॉक्टर श्री चिंतामण पाटील यांचे मार्गदर्शन व प्रेरणा त्यांना नेहमी प्रोत्साहित करत असते.
जीवन जगत असताना वंचित दीनदुबळ्या लोकांची आपल्या हातून सेवा घडवी व समाजसेवेचे भान पाळावे या हेतूने त्या त्यांचे काम नेहमी करत असतात. यामध्ये त्यांची मुले ओम व श्री सुद्धा त्यांनी दिलेल्या आदर्शावरच चालतात.
थोर महापुरुषांच्या जयंतीला अथवा काही विशेष निमित्ताने म्हणा, त्यानिमित्ताचे अवचित्य साधत आश्रम शाळा,जिल्हा परिषद शाळा,अनाथ आश्रम, मूकबधिर शाळा, वृद्धाश्रम ऊसतोड मजुरांची मुलं, यांना खाऊ, किराणा,शालेय उपयोगी साहित्य, कपडे देऊन आपले सामाजिक उपक्रमातून योगदान देत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
दीदी या मनमिळावू स्वभावाच्या असल्याने सामाजिक,राजकीय, समाजसेवी घटकातील अनेक मान्यवर व महिला त्यांच्याशी एकरूप होत आपल्या मैत्रीपूर्ण विचारांची देवाण-घेवाण करत असतात. त्यांचा स्वतःचा असा मोठा मित्रपरिवार आहे त्यांच्या मैत्रिणी त्यांना"मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस" म्हणतात आणि खरंच त्यात अशा आहेत. अनेकांच्या सुखदुःखात त्या सामील होतात. त्यांनी कोरोना काळात रस्त्यावरील वाटसरूंना व कोरोना रुग्णांना त्यांच्या पतीच्या साह्याने डबे पुरविले व त्या काळात लोकांना आधार देण्याचे काम केले .आत्ताच पार पडलेल्या शिवजयंती सोहळ्यानिमित्त त्यांनी बालविकास केंद्र येथे चार हजार रुपयांचा किराणा दिला.
त्यांच्या मैत्रिणींच्या साह्याने त्या नेहमीच आश्रमास मदत करत असतात त्या नेहमी म्हणतात" मला सोन्यासारख्या मैत्रिणी लाभल्या आहेत "ज्या माझ्या एका हाके वर मदतीला तयार असतात.
त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असणाऱ्या मैत्रिणींचे त्यांनी मनापासून आभार मानले आहेत व अशीच मोलाची साथ नेहमी लाभेल ही अशा व्यक्त केली आहे. आत्ता एक महिन्या आधी अनाथ आश्रमामध्ये किराणा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना हाक दिली आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळत भरपूर किराणाची आश्रमामध्ये सोय झाली. यामध्ये राजमाता ग्रुपही सामील होता.
आत्ताच बारामती मध्ये पार पडलेल्या धनगर समाजाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या समाजकार्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जागर सौभाग्याचा या कार्यक्रमांमध्ये ही त्यांना विशेष असा सन्मान मिळाला🙏🏻
अशा सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आपल्या दीदी यांचा अभिष्टचिंतन दिन असल्याने त्यांच्या कार्याचा त्यांच्या मित्र परिवाराच्यावतीने अनेक शुभेच्छा देऊन गौरव होत आहे .त्यांच्या हातून असेच लाख मोलाचे सामाजिक कार्य घडत राहो आणि वंचित उपेक्षित घटकांना आधार मिळो ह्याच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

