shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत मुलांची आरोग्य तपासणी संपन्न*

*गौराईमळा शाळेत मुलांची आरोग्य तपासणी संपन्न*
 इंदापूर :दि. १/२/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा या ठिकाणी शेळगाव  प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी  डाॅ. प्रणाली भजगवळी व आरोग्य सहायक जगताप सर यांनी शाळेतील मुलांच्या  आरोग्य तपासणीसाठी शाळेस भेट दिली. 
               या वेळी डाॅ. प्रणाली मॅडम यांनी सर्व मुलांची आरोग्य तपासणी करुन समस्या असणाऱ्या मुलांना प्रथम उपचार म्हणुन औषधे दिली.तसेच मुलांच्या आहारा ,व्यायाम, आहारातील भाज्यांचे महत्त्व ,पाणी दररोज किती प्यायले पाहिजे, शालेय जीवनातील खेळाचे महत्त्व,मोबाईलचे दुष्पपरिणाम इत्यादी विष यावर सविस्तर माहिती दिली. शाळा मध्ये योगाचे महत्त्व  आणि कोणता योगा करावा व यासाठी महत्वाचे आहे हे सांगितले. प्राथमिक उपचार कसा असायला पाहीजे या बदल मुलांना अवगत केले.स्वच्छ हात  न धुतल्यामुळ लहान वयात बरेच आजार उद्धभवतात , त्याला प्रतिबंधात्मक म्हणुन स्वच्छ हात  धुण्याची पद्धत कशी असायला पाहीजे हे सांगून मुलांकडून ते करुन घेतले .निरोगी आहारासाठी  पालक भेट असायला पाहिजे हे सांगून शाळे मध्ये पाणी पिण्यासाठी  एक रिंग बेल असायला पाहिजे हे सांगितले
          प्रथमोपचार म्हणजे एखादा अपघात घडल्यानंतर प्राथमिक व तत्काळ केलेली उपाय होय या बाबतीत सविस्तर माहिती तसेच प्रथमोपचार पेटीतील साहित्य त्यातील औषध कोणती असावी या बद्दल माहिती देऊन ते साहित्य शाळेत उपलब्ध करुन दिले.हात कशा पद्धतीने धुतले पाहिजेत याचे प्रत्यक्षिक दाखवुन त्याचे महत्त्व सांगितले.
            मुलांच्या आरोग्यतपासणी मोहिमे अंतर्गत ,जंत नाशक मोहीम अंतर्गत जंत निर्माण होण्याची कारणे व त्यावरील उपाय या बाबतीत डाॅ.प्रणाली मॅडम यांनी मुलांना सविस्तर माहिती दिली .या वेळी मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर उपस्थितीत होते.शेवटी उपशिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी आभार मानले.
close