shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी- खडांबे शिवारात मुरुम उत्खन्नन सुरूच : गवळी वस्ती शाळेच्या पाठीमागे मुरूम तस्करीमुळे पडले मोठ मोठे खड्डे ; मुरूम तस्कर भगवानच्या मुसक्या कोण आवळणार..!!

राहुरी- खडांबे शिवारात मुरुम उत्खन्नन सुरूच : गवळी वस्ती शाळेच्या पाठीमागे मुरूम तस्करीमुळे पडले मोठ मोठे खड्डे ; मुरूम तस्कर भगवानच्या मुसक्या कोण आवळणार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
गुरूवार दिनांक ०१ फेब्रूवारी २०२४

राहुरी :  तालुक्यातील खडांबे शिवारात भगवान नामक मुरुम तस्कर महसूल प्रशासनातील त्या भागातील तलाठी भाऊसाहेबाला हाताशी धरून अवैध मुरुम उत्खनन करत असून या मुरूम तस्कर असलेल्या भगवानच्या महसूल प्रशासन मुसक्या आवळणार का? याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    खडांबे शिवारातील गवळी शाळेच्या पाठीमागे असलेल्या वनविभागाच्या गायरान जमिनीतून मोठ्या प्रमाणात जेसिबीच्या साह्याने उपसा करून डंपर व ट्रॅक्टरद्वारे अवैध मुरूम उत्खन्नन रात्रंदिवस सुरू असून या मुरूम तस्करीला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, हा खरा सवाल ऐरणीवर आहे.

       या भागातील भगवान नामक मुरूम तस्कराने या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुरूम तस्करी केली असून आज ही सुरूच  आहे. या भागामध्ये सर्रासपणे मुरूम तस्करी होत असल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत.
हा भगवान नामक मुरूम तस्कर स्थानिक तलाठ्याच्या छोट्या आशीर्वादाने व काही राजकारणी लोकांच्या सहकार्याने या भागातील नागरिकांवर लक्ष केंद्रीत करत सर्रासपणे मुरूम तस्करी करून शासनाच्या मालकीचे गौण खनिज चोरी करत आपले उखळ पांढरे करत आहे. राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारामधे गवळी वस्ती शाळेच्या पाठीमागे गायरान जमीन,वन विभागाच्या, विद्यापीठाच्या जमिनिमधून मोठ्या प्रमाणात अवैद्य मुरूम उपसा होत आहे.

मुरूम तस्कर भगवान याला कोणाचा आशीर्वाद..?
"या भागातील मुरूम तस्कर भगवान हा महसूल व वन विभागाच्या तसेच विद्यापीठ प्रशासनातील कोणा कोणाच्या संपर्कात आहे? याला कोणाकोणाचा आशीर्वाद आहे? हा मुरूम तस्कर ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला हाताशी धरून मुरुम वाहतूक करत आहे. या मुरूम उत्खननामुळे अनेकांच्या पिण्याच्या पाईपलाईनही फुटलेल्या आहेत. मात्र याकडे खडांबे ग्रामपंचायत प्रशासन, महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे."

   या अवैध मुरूम उपशाला या भागातील तलाठी भाऊसाहेबाचा आशीर्वाद असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. मुरूम तस्करी करणारा भगवान याला काही राजकीय आशीर्वादही असल्याचे बोलले जात आहे. तसेच विद्यापीठातील काही सुरक्षा विभागातील घरभेदी सामील असल्याचे परिसरामध्ये चर्चा होत आहे. महसूल प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केल्यास जेसीबी व डंपर आढळून येतील.

    या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन झाल्याने मोठ्या प्रमाणात २० ते ३० फुटाचे खड्डे पडलेले आहेत. महसूल प्रशासनाने गवळी वस्ती, तसेच प्रसाद शुगर नजीक  जाऊन पंचनामा करावा व संबंधित मुरूम तस्करावर व या मुरूम तस्कराला पाठीशी घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.
  
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close