श्रीरामपूर प्रतिनिधी:
शिवचरिञ हे राष्ट्रीय चरिञ असून राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने ते अभ्यासले पाहिजे व त्यनुसार अनुकरण केले पाहिजे.छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करून घराघरात शिवराय मनामनात शिवराय व शिवविचार, आदर्श शासन, लोककल्याणकारी राजा पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन व्याख्याते प्रफुल्ल खपके यांनी केले.
शिवरायांचे विचार लोकांपर्यन्त पोचविण्यासाठी सुवर्ण सप्ताहाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमाला संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स (श्रीरामपूर) येथे व्याख्यानाचे आयोजन केले होते.यप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून श्री.खपके बोलत होते.ते म्हणाले की, इतिहासाकडे वळून बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणे क्रमप्राप्त ठरते.छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेसातशे वर्षांचे पारतंत्र्य अवघ्या ३५ वर्षांमध्ये हटवले. जगाच्या इतिहासात सर्वात कमी कालखंडामध्ये झालेली सर्वात मोठी क्रांती म्हणून इतिहास आणि शिवकालीन स्वराज्याची नोंद घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्या बद्दल असलेले धोरण अर्थात शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही हात लावता कामा नये ही सर्व सैन्याला दिलेली सूचना देणारे एकमेव राजा होते.आज मोबाईल व समाज माध्यमांच्या विळख्यात अडकलेले विद्यार्थी व तरुणांच्या ओठावर शिवकालीन इतिहास आला पाहिजे. त्यातून उद्याचे नेतृत्व व कर्तुत्व बहरले पाहिजे हा विचार पालकांनी व शिक्षकांनी आपल्या पाल्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा हा संदेश व्याख्यानाच्या माध्यमातून देण्यात आला. समारोप व आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.
*पत्रकार सुनंदाताई शेंडे - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

