पाथर्डी प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीमती मोनिकाताई राजीव राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा पाटील राजळे शिक्षण संस्था आदिनाथनगर, तालुका- पाथर्डी, जिल्हा अहमदनगर याठिकाणी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने,महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने व महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्याच्या हेतूने सर्व रोग निदान शिबिर आणि सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य शिबिरास डॉक्टर विनायकराव हाडके (शेवगाव), डॉक्टर निलेश म्हस्के (तिसगाव) डॉक्टर संतोष पायघन, डॉक्टर स्नेहल घाडगे, डॉक्टर मुकुंद दारकुंडे यांचे विशेष सहकार्य लाभले .
श्रीमती आमदार मोनिकाताई राजळे यांचा तालुक्यातील महिला भगिनींच्या तसेच विविध कार्यकर्त्यांनी शाल, श्रीफळ, गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर सर्व माता- भगिनींना आणि कार्यकर्त्यांना अल्पोहार देण्यात आला.
संस्थेच्या वतीने सर्व महिला भगिनी व भारतीय जनता पार्टीच्या विविध भागातून आलेल्या महिला कार्यकर्त्यांचे स्वागत करतांना डॉ.सुभाष ज.देशमुख, सौ.अर्चना भगत, सौ.स्वाती म्हस्के, सौ.सुलभा बोरुडे, सौ.सविता मुळे, सौ.मीनाक्षी वीर, सौ.रंजना चन्ने, सौ.सिंधुताई साठे, सौ.मंगल कोकाटे, सौ.सुनिता काटे, सौ.रामेश्वरी शिंदे,कुमारी समृद्धी साठे आदि मान्यवर होते.
याप्रसंगी माननीय राहुल राजळे, कासार पिंपळगावच्या सरपंच सौ. मोनाली राजळे, युवा नेते श्री कृष्णा राजळे, मा. जे. आर. पवार, माननीय श्री सुभाष बुधवंत, शिक्षण संस्थेचे सचिव मा. जे. आर. महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर आणि आप्पासाहेब राजळे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य मा. श्री प्रदीप देशमुख, मा. श्री भास्करराव गोरे आदी उपस्थित होते.
*पत्रकार वजीरभाई शेख - पाथर्डी
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

