शिव जयंती निमित्त शालेय साहित्य किट वाटप.
प्रा.सागर घरत
भिगवण: - मदनवाडी येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त स्वर्गीय शंकर आण्णा गायकवाड यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन ढवळे मित्र परिवार अयोजित अडीचशे विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य किट वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जयंती निमित्त इतर निष्फळ खर्च टाळत हर्षवर्धन ढवळे यांनी शिवजयंती निमित्त समाज उपयोगी कार्यक्रम घेत शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने जतन करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. इयत्ता ७ वी मधील विद्यार्थीनी स्नेहा बडंगर हिने शिवाजी महाराजांवर भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुदळे गुरूजी यांनी केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आबासाहेब देवकाते, सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर, आदर्श सरपंच हेमाताई माडगे, सचिन बोगावात, राजाभाऊ देवकाते, आण्णासाहेब धवडे, रणजित निकम, जालिंदर ढवळे, विष्णुपंत देवकाते, कुंडलिक बंडगर, राजेंद्र भिसे, सुभाष फलफले, अमोल गायकवाड, अक्षय जगताप, विशाल धुमाळ, अक्षय ढवळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

