शिरसगांव विद्यालय १० वी
विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
श्रीरामपूर प्रतिनिधी:
आज आपण इथे जमलो आहोत आपले आई - वडील आपल्यासाठी कष्ट करतात आपल्याला यापुढे गुणवत्ता सिद्ध करायची आहे.हजारो वर्षापासून आपली संस्कृती टिकून आहे.संगणक शिक्षण महत्वाचे आहे.१० वी चा परीक्षा फॉर्म भरलेला एकही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही अशा शुभेच्छा, आत्मविश्वास महत्वाचा आहे.आपल्या आयुष्याच्या परीक्षेत आपण धैर्याने, आत्मविश्वासाने सामोरे जा,यश आपलेच आहे त्यासाठी जिद्दीने चिकाटीने आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी.स्व.खा.गोविंदराव आदिक,स्व.जी के पाटील यांनी शाळा सुरु करण्यासाठी फार कष्ट घेतले,आपल्या शाळेने जे संस्कार दिले ते जीवनभर जपावेत.स्व.खा गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिरसगाव येथील १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोपसमारंभप्रसंगी प्रमुख अतिथी माजी उप शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अ.नगर सुलोचनाताई पटारे यांनी प्रतिपादन केले.अध्यक्षस्थानी माजी प्राचार्या विमल पटारे यांनी सांगितले की जगात सर्वात शक्तिशाली आपले आई-वडील आहेत.
यशस्वी होण्यासाठी आई वडिलांची आवश्यकता असते. त्यामुळेच पुढे जाऊ शकतो.या शाळेने जे ज्ञान दिले आहे त्याचा उपयोग करून परीक्षा द्या व यशवंत व्हा..यावेळी प्राचार्या सुमती औताडे,विश्वनाथ बडाख,उषा जगताप,संजय शिंदे,आदींनी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले व आठवणी सांगितल्या. यावेळी सर्व शिक्षकवृंद,कर्मचारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन दिलीप गवारे यांनी केले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
9561174111

