shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री संत गाडगे महाराज यांची १४८ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी


श्री संत गाडगे महाराज यांचे कार्य
 अलौकिक - माजी प्रा. टी ई शेळके 

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्री संत गाडगे महाराज यांची जयंती शहरात विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.

येथील कांदा मार्केट परिसरातील श्री संत गाडगे महाराज मंदिरामध्ये बाबांची १४८ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करूण पूजन व अभिवादन करण्यात आले प्रसंगी प्रा.डॉ‌. बाबुराव उपाध्ये यांनी श्री संत गाडगे महाराज यांचे जीवन चरित्र सांगून खरा देव मनात असतो स्वच्छता व निर्मळ भक्तीमध्ये भेटत असतो तसेच बाबांची कविता सादर करून अभिवादन केले.
 माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी सर्व समाजाने एकत्रित येत बाबांचा जयंती उत्सव साजरा केला, तसेच गाडगेबाबा यांचा आदर्श जपावा तसेच बाबांचे कार्य अलौकिक असे होते असे ते म्हणाले.
  प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय फंड,ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, पत्रकार राजेंद्र देसाई, माजी ग्रा. प.सदस्य दिपकराव दळवी, दिनेश तरटे,सामाजिक कार्यकर्ते पोपटराव नलावडे, योगेश राऊत, गौतम शिरसाठ कवी पत्रकार राजेन्द्र नारायणे, जगदिश जाधव, चितांमणी काळे यांनी सर्वांचे स्वागत केले .

यावेळी इंजि. प्रविण निकम, आकाश नलावडे, कैलासराव खंदारे, कुमार खंदारे, संजय खंदारे, शुभम खंदारे, कृपाल खंदारे,नानीबाई खैरे,अंजनाबाई पगार, सरोदे मावशी, खंदारेताई, नवलेमावशी, बुधवंतताई,
श्रीसंत गाडगे महाराज यांना नमन करत भजन हरीपाठ आदि कार्यक्रम संपन्न झाले  
 राजेन्द्र देसाई व दिनेश तरटे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close