श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील डॉ. मदनलाल आणि प्रा. सौ. मंजिरी सोमाणी यांचे नातू तसेच प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आशिष सोमाणी व पॅथॉलॉजिस्ट डॉ. सौ. अर्चना सोमाणी यांचे चिरंजीव अर्चित सोमाणी यांनी एम.बी.बी.एस. गुणवता पूर्ण यश मिळविले आणि पुढील अभ्यासासाठी प्रवासाला जात असताना अनेक मान्यवरांतर्फे अर्चित सोमाणी यांचा शुभेच्छा सत्कार संपन्न झाला. शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या वतीने व जिजामाता तरुण मंडळातर्फे सत्कार शुभेच्छा देताना संजय छल्लारे, भगवान उपाध्ये, तेजस बोरावके, विजय सेवक, प्रमोद गायकवाड, योगेश धसाळ उपस्थित होते. तसेच स्नेहग्रुप परिवाराचे संस्थापक,अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये,डॉ.अजित देशपाडे व डॉ.सौ.सरिता देशपांडे आदिंनी अर्चित सोमाणी यांचा सन्मान करून सोमाणी परिवारतील तिन्ही पिढ्यातील प्रगती विषयी आनंद व्यक्त केला.
यावेळी डॉ. मदनलाल सोमाणी, प्रा.सौ.मंजिरी सोमाणी,डॉ. आशिष सोमाणी, डॉ.सौ.अर्चना सोमाणी यांच्यासह सोमाणी परिवार उपस्थित होते. अर्चित आशिष सोमाणी यांनी सर्वांनी केलेल्या सत्कारविषयी आनंद व्यक्त करीत आभार मानले.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

