shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उर्दू ही प्यारी जुबान, श्रीरामपुरात उर्दू घर होण्यासाठी प्रयत्न करणार - अविनाश आदिक

उर्दू साहित्य परिषदेच्या उर्दू सप्ताहाचा शानदार समारोप

श्रीरामपूर प्रतिनिधी:
उर्दू ही प्रेम, स्नेह वाढविणारी भाषा आहे.प्यारी जुबान आहे. ती कोणतीही एका विशिष्ट समाजाची भाषा नाही.जिल्ह्यात सर्वाधिक उर्दू भाषिक श्रीरामपुरात असल्यामुळे अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या मागणीनुसार येथे उर्दू घर होण्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी आपण लवकरात लवकर प्रस्ताव द्या असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांनी केले. 


अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेतर्फे जिल्ह्यात संपन्न झालेल्या उर्दू सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्मीजान एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद रफीक शेख होते. व्यासपीठावर शिवसेना नेते संजय छल्लारे,श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा,नगरसेवक मुक्तार शाह,समीना भाभी शेख, कलीम कुरेशी, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, रज्जाक पठाण, जावेद काझी, तेजस बोरावके,सामाजिक कार्यकर्ते मुक्तारभाई मणियार, याकुब शाह, नजीर मामू शेख, ॲडवोकेट शफी अहमद,डॉक्टर राज शेख,डॉक्टर शफी शेख, सेवानिवृत्त ए एस आय इब्राहिम शेख,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष सय्यद जाकीर हुसेन, मुख्याध्यापिका महेजबीन खान,वहिदा सय्यद,आरिफा सय्यद, माजी मुख्याध्यापिका शकीला शेख,नसीम शेख आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविक भाषणात उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी जिल्हाभरात साजरा करण्यात आलेल्या उर्दू सप्ताहाबद्दल माहिती दिली.
गेली पंधरा वर्षापासून साजरा करण्यात येणाऱ्या या उर्दू सप्ताह मध्ये यावर्षी देखील जिल्हाभरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी व नागरिकांनी मोठा सहभाग घेतला.

सप्ताहभरात उर्दू भाषेशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात आले. श्रीरामपुरात उर्दू साहित्य संमेलन घेण्यासाठी तसेच उर्दू घर होण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी त्यांनी केली तोच संदर्भ घेऊन अविनाश आदिक बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यामुळे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे बजेट ५० कोटी वरून ५०० कोटी करण्यात आले आहे.आम्ही जरी भाजपबरोबर सत्तेत सामील असलो तरी अल्पसंख्याक समाजाचे हितरक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारली आहे. त्यानुसार अल्पसंख्यांक समुदायाच्या विकासासाठीच्या योजना आम्ही राबवत आहोत. भविष्यातही राबविणार आहोत असे ही आदिक यांनी सांगितले.

शिवसेना नेते संजय छल्लारे यांनी उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांच्या माध्यमातून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून उर्दू भाषेचा गोडवा न्याराच आहे मला देखील उर्दू भाषेचे हेवा वाटतो असे सांगून उर्दू भाषेतील शेरोशायरी मनापासून आवडते याचा आवर्जून उल्लेख केला.श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांनी उर्दू साहित्य परिषदेच्या कामाचे कौतुक करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात मोहम्मद रफीक शेख यांनी उर्दू भाषेच्या प्रगतीसाठी उर्दू साहित्य परिषद करीत असलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे सांगून पुढील वर्षी आमच्या संस्थेतर्फे मोठ्या प्रमाणात उर्दू सप्ताह साजरा करू असे आश्वासन दिले.

यावेळी विविध शाळातील विद्यार्थ्यांनी उर्दू भाषेची शायरी, कविता सादर केल्या. खासदार गोविंदराव आदिक उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी उर्दू सप्ताहात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पारितोषिके शाळेचे वतीने देण्यात आली.उर्दू साहित्य परिषदेतर्फे शाळेस देणगी स्वरूपात पुस्तके देण्यात आली.नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक पाच ला मुख्यमंत्री सुंदर शाळा योजनेअंतर्गत एक लाख रुपयाचे बक्षीस मिळाल्याबद्दल शाळेच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील उर्दू शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन तनवीर रझा यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका महेजबीन खान यांनी मानले.

कार्यक्रमास इब्राहिम शेख, सामाजिक कार्यकर्ते मुक्तारभाई मनियार, डॉक्टर शफी शेख, तेजस बोरावके, शादाब शाह, इमरान बागवान, मुस्ताक शेख, माजी मुख्याध्यापिका शकीला शेख, नसीम शेख, माजी मुख्याध्यापक जलील कुरेशी, केंद्रप्रमुख राजू इनामदार, साधन व्यक्ती शाहीन शेख, मुख्याध्यापिका वहिदा सय्यद, आरेफा सय्यद, नाजिया शेख, इमदादुल्ला, शेखआदिल यांच्या सह विविध उर्दू शाळा चे शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उम्मती फाउंडेशन,एस के खान, मुन्ना पठाण, मुख्तार मणियार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.


अत्यंत महत्त्वाचे काम असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अविनाश आदिक यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ दिला एवढेच नव्हे तर अचूक वेळेवर ते कार्यक्रम स्थळी हजर झाले त्याबद्दल उर्दू साहित्य परिषदेतर्फे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी त्यांना धन्यवाद दिले.


उर्दू भाषेच्या विकासासाठी उर्दू साहित्य परिषद राबवीत असलेले विविध उपक्रम निश्चितपणे प्रशासनी आहेत परंतु या उर्दू भाषेमुळे विकास कोणाचा होतोय असा चिमटा कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहमद रफिक शेख यांनी आपल्या भाषणातून काढला.उर्दू शिक्षकांनी अंतर्मुख होऊन आपल्या कार्याच्या प्रति आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी हिने मै उर्दू जबाँ हू हे गीत सादर केले तर परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल उर्दू स्कूल नंबर पाच च्या विद्यार्थिनींनी लता हया, डॉ कमर सुरूर,हिना तैमुरी,डॉक्टर राहत इंदोरी यांची वेशभूषा धारण करून त्यांच्या काव्यपंक्ती सादर केल्या.


गेले आठवडाभर जिल्ह्यातील सर्व ऊर्दू  शाळांमधून उर्दू सप्ताह निमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात आले. या निमित्ताने उर्दू सप्ताह मधील विविध उपक्रम साजरे करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या शाळा व शिक्षकांच्या गोपनीअभिलेखांमध्ये नोंदी करण्याची मागणी उर्दू साहित्य परिषदेतर्फे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

*पत्रकार राजु मिर्जा
(ब्युरो चीफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close