shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कायदा प्रेमींचे साक्री शहरात भव्य राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन


 *संमेलनास राज्यभरातील कायदाप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*

अजीजभाईशेख / राहाता
राहाता - कायद्याचा वापर करीत भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम कायदा प्रेमींसाठी राज्यस्तरीय संमेलन दि.१० मार्च २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका असलेल्या साक्री (जिल्हा धुळे) येथे भरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यात पुढे असे म्हटले आहे की,  संमेलनाची जोरदार तयारी सुरू असून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक माहिती अधिकार, सेवा हमी कायदा, ग्राहक संरक्षण व इतर कायद्यातील ज्ञानाचा वापर करून भ्रष्टाचार विरोधी लढा देणारे कायदाप्रेमींकरीता संमेलन आयोजित करण्याबाबत महाराष्ट्रातील कायदाप्रेमीं सोबत गुगल मिटिंग द्वारे चर्चा करून खानदेशमधील धुळे जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा तालुका असलेले साक्री हे स्थान निश्चित करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने संमेलनाची जोरदार तयारी सुरू असून साक्री शहरातील एका प्रशस्त हॉलमध्ये सदर संमेलन भरविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.


संमेलनात सहभागी होणारे कायदाप्रेमींसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर संमेलनात भारतीय संविधान तसेच भारतीय कायदे, सामान्य व्यक्तीचे अधिकार, ग्राहकांचे अधिकारासह   कायद्याद्वारे प्राप्त सर्व अधिकारासंबंधीत तज्ञ,अभ्यासक व्यक्तींकडून मार्गदर्शन लाभणार असून वर्तमानात भ्रष्टाचार विरोधी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्भवणाऱ्या समस्यां बाबतीत तसेच कायदेशीर प्रक्रियेत उद्भवणाऱ्या समस्ये संबंधित दुपारच्या सत्रात सन्माननीय कायदा प्रेमींचे कायद्यासंबंधीत चर्चासत्र साठी देखील वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. 

या कायदाप्रेमी आयोजित राज्यस्तरीय संमेलनाच्या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कायदा प्रेमींना प्रमाणपत्र देण्यात येणार असून याबरोबरच कायद्याचा वापर करून भ्रष्टाचार विरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व नवीन कायद्यांविषयी आवड असणारे अभ्यासू कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. संमेलनात सहभागी होणाऱ्या कायदाप्रेमींनी श्री. *निलेश तोरवणे - 7756930103, श्री. सुरेंद्र भदाणे - 7588518129, श्री. *माधवराव दोरीक -  9960223278 यांच्याशी वरील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून आपली नाव नोंदणी करून घ्यावी.
भ्रष्टाचार मुक्त लढा देणाऱ्या व भ्रष्टाचार मुक्त भारताची स्वप्न पाहणाऱ्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन धुळे जिल्ह्यासह तमाम महाराष्ट्रातील कायदाप्रेमीं तर्फे जागरूक नागरिकांना करण्यात आले आहे.

*पत्रकार अजिजभाई शेख / राहाता
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close