शौकतभाई शेख / श्रीरामपूर
अहमदनगर जिमाका वृत्तसेवा: प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी देशभरातील विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचे भुमिपुजन करुन राष्ट्राला समर्पण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दूरस्थ प्रणालीव्दारे राजकोट (गुजरात) येथे सायंकाळी ४.४५ ते ५.४५ वाजेपर्यंत आयोजीत केलेला आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील ५ जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी रु. १३५.०५ कोटी इतक्या रक्कमेच्या कामांचे भुमिपुजन तसेच राज्यातील रु.८८.१८ कोटी रु. किंमतीच्या १० कामांचे लोकापर्ण यावेळी करण्यात येणार आहे.
अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय परीसरातील नवीन ५० खाटांच्या क्रिटीकल केअर हॉस्पीटल ब्लॉक या इमारती करीता रु. २३७५ लक्ष रक्कमेच्या कामाच्या भुमिपुजनचा समावेश आहे. या निमित्ताने आरोग्याच्या बाबतीत दर्जेदार सेवा सुविधा जन सामान्याकरीता निशुल्क व प्रभावी पध्दतीने उपलब्ध करुन देवुन विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्यात येत आहे.
जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे या दूरस्थ भूमिपुजनाच्या डिजिटल पदधतीने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असुन दुरदृश्य प्रणालीव्दारे कार्यक्रमस्थळी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. जिल्हातील शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

