श्रीरामपूर प्रतिनिधी:
संत रोहिदास महाराज हे थोर मानवतावादी संत होते, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित संत रोहिदास महाराज यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते.
ससाणे पुढे म्हणाले की संत रोहिदास महाराज यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला. संपूर्ण भारतभर भ्रमण करून त्यांनी सामाजिक एकता, समता व बंधुतेसाठी लोकजागृतीचे कार्य केले. संत रोहिदास महाराजांचे जीवन व शिकवण सामाजिक सुधारणेच्या वचनबद्धतेस अधोरेखित करते . यावेळी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले,काँग्रेस सेवा दल चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, प्रविण नवले, सुरेश ठुबे, रितेश एडके, डॉ.राजेंद्र लोंढे, युवराज फंड, अशोक जगधने, अमोल शेटे, सुनील साबळे, युनुस पटेल, भैय्याभाई अत्तार, संजय गोसावी, विशाल साळवे, योगेश गायकवाड, गणेश काते,राजेश जोंधळे, श्रेयस रोटे, अभिषेक क्षीरसागर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

