shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोकर-वडाळामहादेव रस्त्यावरील अतिक्रमण काढा


*अन्यथा तहसिल कार्यालयासमोर उपोषणाचा ग्रामपंचयातीस इशारा

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील भोकर - वडाळा महादेव रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता वाहतुकीस खुला करावा अन्यथा दि.२० फेब्रुवारी पासून श्रीरामपूर तहसिल कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा वजा मागणी येथील विविध पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे भोकर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांचेकडे केली आहे.
भोकर - वडाळा महादेव रस्त्यावर काही अनाधिकृत बांधकामे झाली आहेत व काही चालु आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीस अडचणी येत आहे. या रस्त्यावरून शेतकर्‍यांची ऊस वाहतुक सुरू असते. या अवजड वाहनांना यामुळे मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे या रस्त्यावर अपघात घडू शकतात. त्यामुळे या रस्त्यावर होणारे अतिक्रमण त्वरीत काढण्यात यावेत व रस्ता खुला करावा अन्यथा श्रीरामपूर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आला आहे.
या निवेदनावर सुदाम महाराज चौधरी, सोसायटीचे माजी अध्यक्ष राहुल अभंग, सागर शिंदे, रामदास शिंदे, सचीन पोखरकर, हरीभाऊ पटारे, कचरू पटारे, धनंजय चौधरी, बाळासाहेब शिंदे, रामभाऊ पवार, गणेश कांबळे, राजेंद्र विधाटे, गणेश विधाटे, सागर अभंग, आप्पासाहेब जाधव, राजेंद्र चौधरी, गणेश खेडकर, लक्ष्मण पटारे, गणपत कुर्‍हे आदिंच्या सह्या आहेत.
दरम्यान यापुर्वी भोकर गावच्या लगत असलेल्या एका रस्त्यावरील अक्रिमणाचा विषय अशाच प्रकारे सुरू झाला तो वाद बरेच दिवस चालला आता भोकर येथे ही असाच काहीसा प्रकार पहील्यांदाच सुरू झाल्याने या विषयाला वेगळे महत्व तयार होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

    भोकर-वडाळामहादेव रस्त्यावरील अतिक्रमण काढावे अन्यथा उपोषणाचा इशारा देणारे निवेदन भोकर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांना देताना प्रताप पटारे, दिपक शेळके, लक्ष्मण पटारे, सम्राट माळवदे, सागर शिंदे, सचीन पोखरकर आदि दिसत आहे.

*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close