shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणास पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाचेवतीने भोकर येथे कडकडीत बंद


श्रीरामपूर प्रतिनिधी:
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठींबा म्हणून तालुक्यातील भोकर येथील सकल मराठा समाजाच्या युवकांनी पुकारलेल्या बंद ला भोकर येथे उस्पुर्त प्रतिसाद मिळाला. येथील व्यावसायीकांनी आपआपले व्यवहार व व्यासाय बंद ठेवून या आवाहनास प्रतिसाद दिला.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील सकल मराठा समाजाचे वतीने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठींबा देण्यासाठी तसेच जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून आरक्षण अंमलबजावणी करावी या मागणीसाठी भोकर येथील सकल मराठा समाजाच्या युवकांनी गाव बंद ठेवण्याचे आवाहन भोकर ग्रामस्थांना केले. त्यास गावातील सर्व व्यावसायीक बांधवांनी प्रतिसाद देत सर्व व्यावहार व व्यासाय बंद ठेवून साद दिली. त्यामुळे गावात दिवसभर शुकशुकाट होता.
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणा दरम्यान त्यांची तब्बेत खालावत आहे तरी शासन आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही व जरांगे पाटील यांच्या उपोषण गांभीर्याने घेत नाही म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून गाव बंद ठेवण्यात आले. आमच्या प्रमाणेच इतर गावांनी ही यात सहभाग नोंदवत या उपोषणास पाठींबा द्यावा असे आवाहन यावेळी येथील सकल मराठा समाज संघटनेच्या युवकांनी केले आहे.

येथील बंद यशस्वीतेसाठी येथील सरपंच पती प्रताप पटारे, उपसरपंच सागर आहेर, ग्रामपंचायत सदस्य संदिप गांधले, गीरीष मते व मयुर काळे तसेच सचीन पोखरकर, योगेश आबुज, माजी उपसरपंच राजेंद्र चौधरी, दिपक शेळके, ज्ञानेश्वर काळे, लक्ष्मण पटारे, संकेत आबुज, सचीन शेळके, आप्पासाहेब पटारे, निलेश मते, भानुदास बेरड, शंकर बेरड आदिंसह सकल मराठा समाजाचे युवकांनी विशेष परीश्रम घेतले.

श्रीरामपूर - भोकर येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणास पाठींबा म्हणून भोकर येथे सर्व व्यावहार बंद ठेवून पुकारण्यात आलेला बंद यशस्वी झाल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111
close