shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षकांसाठी क्षमतावृद्धी प्रशिक्षण उत्साहात सुरू

अहमदनगर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर द्वारे प्रशिक्षण आयोजित

प्रतिनिधी :  जावेद शेख

कोकमठाण : १६ /   राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर जिल्हा अहमदनगर, माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा मालिक शैक्षणिक संकुल  कोकणठाण, कोपरगाव येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी जिल्हास्तरीय प्रशिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार राज्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे . सदर धोरणामध्ये अपेक्षित केल्याप्रमाणे प्रत्येक घटकाची धोरणानुसार प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने समग्र सक्षमीकरण होणे आवश्यक आहे, सदर प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची ओळख, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ,शालेय शिक्षण कृती संशोधन व नवोपक्रम नवनवीन अध्यापन पद्धती, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून दृष्टीक्षेपात आलेली संपादनूक स्थिती ,कुमार अवस्थेतील मुलांना समजून घेताना,अध्ययन अध्यापनात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय शंका समाधान इयत्ता ९ वी ते १२ वी मूल्यमापन पद्धती इत्यादी विषयांवर सुलभकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले हे प्रशिक्षण राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे सर्वांनी अतिशय जबाबदारीने प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डायटचे प्राचार्य डॉ.राजेश बनकर यांनी व्यक्त केले. 

शिक्षक हा नवी पिढी घडवण्याचे काम करतो हे काम करत असताना त्यांनी शैक्षणिक कार्यातील नवनवीन बद्दल स्वीकारले पाहिजे असे आवाहन  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर येथील वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे यांनी  केले,नवीन शैक्षणिक धोरण का आवश्यक आहे याविषयी माहिती देत प्रशिक्षणाचा हेतू स्पष्ट केला कार्यक्रम प्रसंगी प्रशिक्षणाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे डायटचे प्राचार्य राजेश बनकर, वरिष्ठ अधिव्याख्याता डायट अरुण भांगरे, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलचे व्यवस्थापक सुधाकर मलिक ,माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, डायटचे अधिव्याख्याता मुकुंद दहिफळे, कैलास सदगीर, रामेश्वर लोटके, गटशिक्षणाधिकारी  राजेश पावशे ,  गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, प्रशिक्षणाचे सुलभक अरुण भांगरे, रामेश्वर लोटके,डॉ. शंकर गाडेकर, दीपक पाचपुते ,संजय पवार,बाळासाहेब कडू, दत्तात्रय गुंजाळ, अनिल लोखंडे, अनमोल होन ,योगेश जाधव, योगेश खैरनार, स्वाती अहिरे, या सुलभकांनी जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थींना  कृतियुक्त मार्गदर्शन केले, यावेळी मानसशास्त्र विषयाचे महेश पाडेकर उपस्थित होते, शिक्षकांच्या क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचे व्यवस्थापन व यशस्वी नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर अहमदनगर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर लोटके यांनी तर आभार गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी मांनले
close