श्रीरामपूर प्रतिनिधी:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. श्रीरामपूर युवासेना तालुका प्रमुखपदी सुरेश महादेव थोरे तर श्रीरामपुर युवसेना शहर प्रमुख पदी सिद्धांत संजय छल्लारे यांची निवड करण्यात आली आहे.
या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी युवा सेना प्रदेश सचिव वरुण सरदेसाई, युवा सेना कार्यकरिणी सदस्य अंकित प्रभू, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, युवा सेना विस्तारक सुनिल तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.
श्रीरामपूर विधानसभामधील अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीत चिटणीस : उमेश भगवान छल्लारे. उपतालुका युवा प्रमुख : अजित रमेश गुंजाळ, श्रीकांत संजय गुंजाळ, शहर समन्वयक : शिवा दिलीप पानसरे, रोहित शेखर नाईक, निखिल अनिल पवार, उपशहर युवासेना प्रमुख : दत्तू भगवान करडे, विशाल धर्मराज दुपाटी, पवन तुळशीराम सूर्यवंशी, योगेश वामनराव ढसाळ, कॉलेज कक्ष अधिकारी : प्रवतक ज्ञानदेव यादव, कार्तिक संजय लभडे, प्रकाश मनोज परदेशी, जय राजेंद्र औताडे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
तसेच श्रीरामपूर विधानसभा (राहुरी ३२ गाव) तालुका प्रमुख युवा सेना सचिन भाऊसाहेब करें. उपतालुका प्रमुख युवासेना : उमेश रावसाहेब कर्पे यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व नवनिर्वाचित युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
*पत्रकार राजु मिर्जा
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

