श्रीरामपूर प्रतिनिधी:
नव स्वराज्य सेनेच्या वतीने श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.विजयराव खाजेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवाजी महाराजांचा जयजयकार करत अभिवादन केले. यावेळी संपत मोरे, दशरथ भोंगळे सर, डॉक्टर पंडितराव पगारे , विलासराव खाजेकर ,अँड. अण्णासाहेब मोहन आदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यांविषयी माहिती विषद केली.
याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.विजयराव खाजेकर बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे, शिवरायांची नीती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचा संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्माच्या विरुद्ध संघर्ष नव्हता तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता, शिवराय सर्व जाती - धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती-धर्माला थारा नव्हता, आजच्या युवा वर्गाने वरील गोष्टीचे चिंतन करावे, केवळ दाढी मिशी वाढवून कपाळावर चंद्रकोर लावून कुणी शिवाजी महाराज होत नसते, शिवाजी महाराज होण्यासाठी जिजाऊंचे संस्कार इतरांविषयी प्रेम व महिला विषयी आदर हवा आज त्यांचे विचार समजून घेण्याची नितांत गरज आहे.की मी या स्वराज्याचा आहे आणि स्वराज्य माझ आहे असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास संजय वाहूळ, राजूभाई जहागीरदार, विलासराव खाजेकर ,दशरथ भोंगळे सर, संपतराव मोरे ,ज्येष्ठ पत्रकार हमीदभाई चौधरी, रंगनाथ पितळे ,नवनाथ गडकर, सविता रणदिवे, कुमार जाधव ,संगीता गायकवाड, विमल त्रिभुवन, अशोक मोहन, प्रवीण दिवे, रमेश दिवे, रमाताई भालेराव, प्रवीण शहा, अँड .अण्णासाहेब मोहन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*पत्रकार हमीदभाई चौधरी - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

